महाराष्ट्र

वैष्णवांची ओळख असणाऱ्या तुळशीमाळेचा बाजार चीन काबीज करतेय

वारीत आणि वारकऱ्यांच्या गळ्यात आपण तुळशीमाळ पाहिलेली आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात तुळशीमाळ फार महत्वाची आहे. तुळशीमाळ ही खूप पवित्र मानली जाते, त्याचबरोबर तुळशीमाळ घालण्याची अनेक शास्त्रीय कारणे व फायदे आहेत. विठुरायला प्रिय असणारी माळ 108 मण्यांची बनते. मात्र विठुरायला वारकऱ्यांच्या आवडत्या ह्या तुळशीमाळेसमोर चायनामाळेचे आव्हान उभे ठाकले आहे. तुळशीमाळ ही वारकऱ्यांची ओळख आहे. विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार आणि वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीमाळ असते. पण यामध्ये वारकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.वारकरी खऱ्या माळेऐवजी चायनामाळ घेताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षांपासून बाभळी आणि इतर लाकडांपासून बनवलेल्या डुप्लिकेट माळा बाजारात आल्या आहेत. या माळांना चायनामाळ म्हणून ओळखले जाते.

पंढरपूरमध्ये तुळशीमाळ गळ्यात घालून वारकरी संप्रदायात प्रवेश करता येतो. तुळशीच्या 108 मण्यांची ही माळ गळ्यात घातल्याशिवाय कोणालाही वारकरी होता येत नाही. तुळशीची माळ घालणे म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे, असे मानले जाते, ही माळ म्हणजे वैष्णवांची ओळख. जशी तुळस ही भगवान विष्णु यांना अतिप्रिय आहे तशीच तुळशीच्या लाकडापासून बनलेली ही माळ वारकऱ्यांचे दैवत असते. तुळस म्हणजे सात्विकता, मांगल्यता, आणि पवित्रता असते. तुळशीमुळे घरातील वातावरण शुद्ध राहते. ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, कुटुंबातील माणसाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे तुळशीची माळ धारण केल्याने पापे नष्ट होतात अशी भागवत धर्मात धारणा आहे.

हे सुध्दा वाचा:

कमला मिलमध्ये लिफ्ट कोसळल्यानं अपघात, 15 जण जखमी

धुळे-सुरत महामार्गावर भरधाव ट्रकला लागली आग

आधी वादळी खेळीनंतर 4 विकेट, अर्शिन कुलकर्णीची उल्लेखनीय कामगिरी

काशीकापडी समाज हा पंढरपूरमध्ये शेकडो वर्षांपासून तुळशीमाळा बनवण्याचा व्यवसाय करत आहेत. तुळशीच्या लाकडाचे तुकडे राट नावाच्या यंत्रावर कातून त्याचे माणी बनवले जातात आणि या मण्यांपासून माळ बनवली जाते. हातापासून तयार झालेल्या या तुळशी माळेच्या मण्याला लहान होल असतात पण लकडापासून मशीनवर तयार झालेल्या माळेच्या मण्याला मोठे होल असतात.या माळांचे वेगवेगळे प्रकार आहेत जसे गोळमण्यांची माळ, चंदन माळ, कतीव माळ, डबलपट्टी, जपमाळ, पाचपट्टि माळ, दोनपट्टी माळ असे प्रकार आहेत.

मोनाली निचिते

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

42 mins ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

2 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

3 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

3 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

4 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

4 hours ago