CAA ला पाठिंबा देणा-या संघाच्या उलेमा परिषदेत ‘हाणामारी’!

लयभारी न्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) समर्थनासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने दिल्लीत राष्ट्रीय उलेमा परिषदेत बोलावली होती. यावेळी मुस्लिमांच्या दोन गटांमध्ये वाद चिघळला. CAA- NRC विरोधात घोषणाबाजी देण्यात आली. यामुळे संघाची उलेमा परिषद झालीच नाही. विशेष म्हणजे हा प्रकार संघाचे नेते इंद्रेश कुमार यांच्या समोर घडला.

देशभरात CAA आणि NRC ला विरोध होत आहेत. जवळपास ५० पेक्षा जास्त याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र या कायद्याला समर्थन देण्यासाठी संघाने उलेमा परिषद बोलावली होती. काही प्रमुख मुस्लिम नेतेही या परिषदेसाठी आले होते. दरम्यान, परिषद सुरू असतानाच अचानक काही उपस्थितांनी CAA आणि NRC विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यांनी निषेधाचे फलकही झळकावले.

जाहिरात

संघाच्या राष्ट्रीय मुस्लिम मंचाने या परिषदेचे आयोजन केले होते. सीएए व एनआरसी कायद्यांच्या समर्थनासाठी ही परिषद होती. या कायद्यांबाबत मुस्लिम समाजात जो गैरसमज पसरला आहे तो दूर करण्यासाठी ही परिषद असल्याचा दावा आरएसएसकडून करण्यात आला.

सीएए विरोधात घोषणा देणाऱ्यांना बाहेर हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला असता जोरदार राडा झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. वाढता तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि परिषदेत घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

राजीक खान

Recent Posts

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

1 hour ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

1 hour ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

3 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

4 hours ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago