महाराष्ट्र

Fighting : खा. संजयकाका पाटील आणि आ. गोपीचंद पडळकर गटात हाणामारी

टीम लय भारी

सांगली : चप्पल घालून मंदिरात गेल्याच्या कारणावरून आटपाडी तालुक्यातील झरे येथे खा. संजयकाका पाटील आणि आ. गोपीचंद पडळकर गटात तुफान हाणामारी (Fighting) झाली. (Fighting between Sanjaykaka Patil group and Gopichand Padalkar group) विशेष म्हणजे दोघेही भाजपाचेच नेते आहेत.

यावेळी झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची वाहने फोडण्यात आली. याप्रकरणी पडळकर यांचे बंधू व जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर आणि मुंबईतील आयकर विभागाचे सहआयुक्त डॉ. सचिन मोटे यांच्यासह १२ जणांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रम्हानंद पुंडलिक पडळकर (रा. झरे), गणेश भुते (रा. भिंगेवाडी), नवनाथ मारुती सरगर (रा. झरे), अनिल सूर्यवंशी (रा. गोदिरा), विठ्ठ्ल पाटील (रा. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर), पैलवान सत्यजित पाटील (रा. विटा) या आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांवर, तर डॉ. सचिन बीरा मोटे (रा. विभूतवाडी), विनायक ऊर्फ बापूराव मारुती मासाळ, राहुल मारुती मासाळ (दोघेही रा. मासाळवाडी), अक्षय सुदाम अर्जुन (रा. अर्जुनवाडी), राजू पांडुरंग अर्जुन (रा. झरे), नारायण पांडुरंग खरजे (रा. विभुतवाडी) या खासदार पाटील यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रम्हानंद पडळकर हे दुपारी आपल्या मित्रांसह मासाळवाडी येथील मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिरं सुरू करण्यात आल्यामुळे मंदिराच्या परिसरात साफसफाई करण्यात आली होती. पण, ब्रम्हानंद आणि त्यांचे मित्र चपला घालून मंदिरात गेले होते. ही बाब स्थानिक लोकांच्या लक्षात आली. स्थानिकांनी ब्रम्हानंद पडळकर आणि त्यांच्या मित्रांना चपला बाहेर काढून मंदिरात जाण्याची विनंती केली. पण, यावरून दोन्ही गटात वादाला सुरुवात झाली. चपला बाहेर काढण्यावरून दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली. काही वेळाने बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटामध्ये रस्त्यावरच तुफान हाणामारी झाली. या धुमश्चक्रीत गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. त्यामुळे गावात एकच गोंधळ उडाला होता. या प्रकरणी आटपाडी गावात राहणा-या शांताबाई मारुती मासाळ यांनी आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

शांताबाई मारुती मासाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मासाळवाडी येथे सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गणेश भुते यांच्यासह पाचजण मंदिरात चप्पल घालून आले. त्यांना चप्पल घालून येऊ नका, असे म्हटल्यावर त्यांच्याशी वादावादी झाली. मंगळवारी दुपारी संबंधित जमावाने येऊन दोन मोटारी फोडल्या. शांताबाई मासाळ, प्रदीप दगडू पुकळे यांना मारहाण करून जखमी केले. शांताबाई यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र तोडले. मोटारीवर दगडफेक करून त्यातील ८२ हजारांची रक्कम चोरून नेली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, विष्णू लक्ष्मण अर्जुन (रा. आंबेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, खासदार समर्थकांनी त्यांची मोटार (क्र. एमएच ०५ एएस ४७५३) फोडली. त्यांना मारहाण केली. खिशातील ५० हजारांची रक्कम हिसकावून घेतली. गळ्यातील सोन्याची साखळीही नेली. याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी सायंकाळपर्यंत कुणालाही अटक केलेली नव्हती. अधिक तपास पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे करीत आहेत.

अभिषेक सावंत

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

18 hours ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

19 hours ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

19 hours ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

7 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago