महाराष्ट्र

पाच वर्षात पाच पंतप्रधान,नरेंद्र मोदींनी सांगितला काँग्रेसचा नवीन फॉर्म्युला

सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजरे लावली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) काँग्रेसवर (Congress) जोरदार निशाणा साधला. इंडियाआघाडीत नेत्याच्या नावावर महायुद्ध सुरु आहे. आता मला सांगा ज्याचे नाव माहिती नाही, ज्याचे चेहरा माहिती नाही, त्याच्या हातात तुम्ही इतका मोठा देश देणार आहात का? असा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.मला तुमचे आशीर्वाद हवे आहे.मला धन, दौलत नको आहे. मला यश किर्ती नको आहे. मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत.(Five PM’s in five years, Narendra Modi unveils Congress’ new formula)

मी आज तुमचे आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. यंदाच्या निवडणुकीत तुम्ही पुढील 5 वर्षांसाठी विकासाच्या गॅरंटीला निवडणार आहात. दुसरीकडे ते लोक आहेत ज्यांनी 2014 च्या आधी देशाला भष्ट्राचार, आतंकवाद आणि कुशासनात लोटले होते. त्यांच्या या कलंकित इतिहासानंतरही काँग्रेस परत देशाची सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहत आहे. असे मोदींनी म्हटले.

आम्ही कोणाचाही हक्क काढून घेतला नाही.काँग्रेसने सत्तेत असताना SC, ST, OBC यांच्या प्रत्येक हक्काला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामागे त्यांची एक खेळी होती ती म्हणजे यांना असेच आपल्या आश्रिताप्रमाणे राहू द्या, जेणेकरुन त्यांच्याकडून आपल्याला मतदान मिळू शकेल. हे मुद्दाम त्यांनी केले. पण मोदी आणि तुमचे नाते हृदयातून जोडले आहे. गेल्या 10 वर्षात आम्ही सामाजिक न्यायावर काम केले आहे. मी आता गरीबांची सेवा करतोय, ते मी त्यांचे कर्ज फेडत आहे. मी गरीबांच्या खाल्लेल्या मिठाला जागतोय. मेडीकलमध्ये आरक्षण लागू केले. भाजपने SC, ST यांचे आरक्षण वाढवण्याची तरतूद असते. आम्ही ते आरक्षण वाढवले. आम्ही कोणाचाही हक्क काढून घेतला नाही, असे नरेंद्र मोदींनी म्हटले.

पाच वर्षात पाच पंतप्रधान, काँग्रेसचा नवीन फॉर्म्युला
आता त्यांनी एक नवीन फॉर्म्युला आणला आहे. पाच वर्षात पाच पंतप्रधान. एक वर्षात एक पंतप्रधान जेवंढ लुटायचं तेवंढ लुटणार, त्यानतंर दुसऱ्या वर्षात दुसरा पंतप्रधान लूट करणार… असे पाच वर्ष सुरुच राहणार आहे आणि इथे खोटी शिवसेनामधील लोक म्हणतात की त्यांच्या पक्षात पंतप्रधान पदासाठी खूप चेहरे आहेत. त्यांच्यातील एका नेत्याने आम्ही एका वर्षात चार पंतप्रधान बनवले तर काय जातंय? आता मला सांगा पाच वर्ष पाच पंतप्रधान अशा फॉर्म्युल्याने देश चालणार आहे का? आपण कधी त्या दिशेने जाऊ शकतो का? नाही ना. पण त्यांना देशात सत्तेत येण्यासाठी हाच एक पर्याय राहिला आहे. हा आपला महाराष्ट्र सामाजिक न्यायची भूमी आहे. या भूमीने ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकरांच्या रुपाने असे महान व्यक्ती दिले आहेत, ज्यांनी समाजातील सर्वात कमजोर वर्गाला ताकद दिली. प्रेरणा दिली. तुम्ही काँग्रेसचे शासन पाहिले आहेत. त्यासोबतच तुम्ही मोदींच्या 10 वर्षांचा सेवाकालही बघितला आहे. गेल्या 10 वर्षात सामाजिक न्यायसाठी जितके काम झाले, तेवढे कार्य स्वातंत्र्यानंतर कधीच झालेले नाही, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

 

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

11 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

12 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

13 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

17 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

17 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

19 hours ago