महाराष्ट्र

या कारणामुळे शरद पवार ब्रीच कॅंडी रूग्णालयात दाखल

टीम लय भारी

मुंबई :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काल रात्री ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल केले आहे. अचानक त्यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल केले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान करण्यात आले असून त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. काल रात्री पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले. त्यामुळे पवार यांना ३१ मार्चला रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार आहे. तसेच, शरद पवारांवर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

सर्व कार्यक्रम रद्द

पवार हे सध्या सुरु असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेणार होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित होते. परंतु आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याने, पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

 मलिक नेमकं काय म्हणाले?

आमचे अध्यक्ष शरद पवार साहेबांना थोडे अस्वस्थ वाटत होते. काल संध्याकाळी त्यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना तपासणीसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तपासण्या झाल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले.

शरद पवारांना हा त्रास झाल्यामुळे त्यांना देण्यात येत असलेली रक्त पातळ करण्याची औषधे थांबवण्यात आली आहेत. त्यांना  ३१ मार्च २०२१  रोजी रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार आहे. तिथे त्यांची एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्यामुळे पुढील नोटीसपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

 पवारांची प्रकृती स्थिर

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पवारांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. पवारांना नेमके काय झाले हे मला ही माहीत नाही. मलिक यांचे ट्विट वाचल्यानंतर मला कळाले असून मी पवार कुटुंबीयांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्या म्हणाल्या.

Rasika Jadhav

Recent Posts

Eknath Shinde | Devendra Shinde | Jaykumar Gore | सरकार मयतीचे सामान सुद्धा देणार | Ladaki Bahin

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत. गेल्या सलग पाच वेळा ते…

23 mins ago

गर्भधारणेदरम्यान कोणते मीठ अधिक फायदेशीर आहे? जाणून घ्या

प्रत्येक जोडप्यासाठी गर्भधारणा हा एक सुंदर प्रवास असतो. गर्भधारणेच्या 9 महिन्यांच्या चक्रात महिलांच्या शरीरात अनेक…

55 mins ago

Sharad Pawar | Jaykumar Gore | शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या गावची कहाणी

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(The story of…

60 mins ago

Jaykumar Gore | उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी नसते

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे. मीच…

1 hour ago

निरोगी राहण्यासाठी नक्की खा हे सुपरफूड, जाणून घ्या

अन्न हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक अन्नामध्ये विशिष्ट प्रकारचे पोषक घटक आढळतात,…

2 hours ago

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

2 days ago