महाराष्ट्र

…या कारणामुळे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात कुत्रे सोडले

टीम लय भारी

मुंबई :- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणाचे वादग्रस्त राजकारण थांबण्याची अजिबात चिन्हे दिसत नाहीत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ने सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. अटक केल्यानंतर सचिन वाझे यांना पोलीस दलातून दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आले आहे. तरी देखील या प्रकरणामुळे राजकारण चालू आहे. यासंदर्भात शिवसेना नेत्यांवर आरोप करणाऱ्या भाजप नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या निषेधार्थ युवा सेनेचे नेते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी यासंदर्भात आंदोलन करीत भाजप कार्यालयासमोर दोन कुत्रे सोडल्याने खळबळ उडाली.

राणे यांनी यासंदर्भात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचीच नव्हे तर युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांचीही चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेने करावी अशी मागणी करीत त्यांच्यावर विविध आरोप केले होते. त्यामुळे येथील युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त झाले. आज दिवसभर त्यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यासंदर्भात दुपारी एन. डी. पटेल रोड परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणा देत भाजप आणि राणे दोघांचाही निषेध केला. यावेळी त्यांनी दोन कुत्रे आणले होते. त्यांनी हे कुत्रे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या आवारात सोडले. परंतु पोलिसांनी त्यांना विरोध करून हे कुत्रे ताब्यात घेतले.

याबाबत युवा सेनेचे विस्तारक अजिंक्य चुंभळे यांनी ट्वीट केले. तसेच सोशल मिडीयावर पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. ते म्हणाले, आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत. सत्ता नसतांना देखील आम्ही जनतेचे प्रश्न आणि अन्यायाविरोधात कधी ही माघार घेतली नाही. आमचा आक्रमकपणा आम्ही सोडणार नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर खोटे आरोप करतांना जपुन बोलाव. अन्यथा त्यांना तेव्हढ्याच आक्रमकतेने उत्तर दिले जाईल.

ते म्हणाले, कोणी किती ही चिखलफेक केली, तरी चिखलफेक करणाऱ्याचे हातच चिखलाने माखलेले आहेत हे कोणीही विसरू नये. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत. हे जनतेला व्यवस्थितपणे माहित आहे. महाराष्ट्रातील सुशिक्षित युवा शिवसेनेच्या पाठिशी ठाम आहेत. युवा सेना या विषयावर संतप्त आहे.

दरम्यान दुपारी युवा सेनेचे कार्यकर्ते, पादधिकारी यांनी शहरातील एन. डी. पटेल रोड येथील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयासमोर जमल्यावर मोठ्या प्रमाणात भाजप राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी दोन कुत्रे बरोबर आणले होते. त्यांच्या गळ्यात नेत्यांचे नाव लिहिलेले फलक होते. हे कुत्रे त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर सोडले. पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करुन घोषणा देणारे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना परत पाठवले.

Rasika Jadhav

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

7 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

8 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

9 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

9 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

9 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

12 hours ago