महाराष्ट्र

राज्यातील 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला तुर्तास ब्रेक : राजेश टोपे

टीम लय भारी

मुंबई :-  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे, महाराष्ट्रासह विविध राज्यातील लसीकरण कार्यक्रमाला खिळ बसली आहे. महाराष्ट्रात ४५ वर्षांपुढील आणि १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण (Vaccination) सुरू आहे. परंतु, लसींच्या मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला तुर्तास ब्रेक मिळण्याची शक्यता असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे (Rajesh Tope has said that vaccination for 18 to 44 year olds is likely to get a break soon).

कारण या वयोगटातील लसी ४५ वर्षांपुढील गटाच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती देत राज्यातील लस तुटवड्याची वस्तुस्थिती मांडली. राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील उपलब्ध लस आणि केंद्राकडून पुरवण्यात येणाऱ्या लसीच्या साठ्याची माहिती दिली.

जागतिक पातळीवरुन लस खरेदी करणार, BMC चा पुढाकार; आदित्य ठाकरे मैदानात

रुग्णसंख्या वाढली की जनतेवर ढकलायचं आणि कमी झाली की… मनसेचा टोला

राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, “१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीचे लसीकरण (Vaccination) करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने ४५ वर्षांपुढील नागरिकांची जबाबदारी घेतली आहे. परंतु, राज्यात सध्या कोव्हॅक्सिनचे ३५ हजार डोस उपलब्ध आहेत. आता दुसरा डोस द्यायचा आहे, त्यांची संख्या ५ लाखांच्या जवळपास आहे. त्यामुळे १८ ते ४४ या वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले जे कोव्हॅक्सिन आहे, ते आज साधारपणे पावणेतीन लाखांपर्यंत उपलब्ध आहे. त्याचबरोबर केंद्राकडून आलेले ३५ हजार, असे मिळून तीन ते सव्वातीन लाख कोव्हॅक्सिनचे डोस ४५ वर्षापुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला आहे,” अशी माहिती राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

State governments can purchase only 25% of vaccines – belying Centre’s claim of equitable policy

१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी आलेले लसीचे डोस ४५ वर्षांपुढील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठी वापरा, अशी सूचना महाराष्ट्रातील सर्व लसीकरण (Vaccination) केंद्रांना देण्यात आली आहे. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस राहिला आहे, असे नाही. तर कोविशिल्डचे सुद्धा १६ लाख डोस केंद्राकडून यायचे राहिलेले आहेत.

याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी फोनवरून १५ ते २० मिनिटे चर्चा केली. त्यांना याबद्दलची माहिती दिली. पण त्यांच्याकडे लसीचे डोस उपलब्ध नाहीये. त्यामुळे राज्याने खरेदी केलेली लस केंद्राच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वापरावी लागत आहे. टास्क फोर्सची चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी असे म्हणाले की, टास्क फोर्सशी चर्चा करून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण (Vaccination) काही दिवसांसाठी कमी वेगाने करण्यासंदर्भात सूचना केली आहे. त्यामुळे टास्क फोर्सशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल. कारण खरेदी करण्याची तयारी असली, तरी लस उपलब्ध नाही, अशी माहिती राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

Rasika Jadhav

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

3 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

5 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

6 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

1 day ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

1 day ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

1 day ago