महाराष्ट्र

डॉन अरुण गवळीच्या सुट्टीला लॉकडाऊन; कारागृहात शरण होण्याचे आदेश!

टीम लय भारी

नागपूर : कुख्यात गुंड अरूण गवळीने २४ तासांत मुंबई प्रशासनाकडे नागपूर प्रवास करण्याची परवानगी मागावी. ती परवानगी एका दिवसात मंजूर करावी आणि त्यानंतर तीन दिवसात अरुण गवळीने नागपूर गाठावे, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. यापुढे पॅरोलला मुदतवाढ देण्याबाबत कोणतीही याचिका स्विकारली जाणार नाही, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अरुण गवळीला नागपूर हायकोर्टाने दणका दिला आहे. पाच दिवसात नागपूर मध्यवर्ती कारागृहात शरण येण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे गवळींच्या वाढीव सुट्टीला लॉकडाऊन लागला आहे.

अरुण गवळी सध्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी ते नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. न्यायालयाने अरुण गवळीला नवी मुंबईमधील तळोजा कारागृहात जाऊन आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला होता. अरुण गवळीने पॅरोलसाठी अर्ज करताना आपण कोणतंही गैरकृत्य तसंच लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचा युक्तिवाद केला होता. पण न्यायालयाने चांगली वर्तवणूक किंवा नियमांचं उल्लंघन न केल्याच्या धर्तीवर पॅरोल वाढवला जाऊ शकत नाही असं सांगितलं. तसंच पॅरोल वाढवण्यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याचं खंडपीठाने नमूद केलं होतं.

गवळी ४५ दिवसांसाठी पॅरोलवर कारागृहातून होता बाहेर…

अरुण गवळी जवळपास ४५ दिवसांसाठी पत्नीच्या आजारपणाच्या कारणामुळे पॅरोलवर नागपूर कारागृहातून बाहेर आला होता. एप्रिल महिन्याच्या अखेरीस म्हणजेच २७ एप्रिलला त्याने कारागृहात हजर होणं अपेक्षित होतं. पण याचवेळी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. त्यामुळे अरुण गवळीने अर्ज करत पॅरोल वाढवण्याची मागणी केली होती. यावेळी न्यायालयाने अर्ज स्विकारत १० मे पर्यंत अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये वाढ केली होती. यानंतरही अरुण गवळीला वाढ देत २४ मे पर्यंत पॅरोल देण्यात आला होता. न्यायालयाने पॅरोलमध्ये अजून वाढ देण्यास नकार दिला आहे.

राजीक खान

Recent Posts

Eknath Shinde | Ajit Pawar | आताच्या राजकारणात लबाडी, पूर्वीचे राजकारण निष्ठेचे अने प्रामाणिकपणाचे

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(In today's politics lies, earlier politics…

58 mins ago

Eknath Shinde सातारचे, पण स्वत:चीच घरे भरतात | उदयनराजे १५ वर्षात आमच्या गावात आले नाहीत

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath shinde is bad CM). गेल्या…

1 hour ago

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

14 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

15 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

18 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

18 hours ago