गोपीचंद पडळकरांचा बारामतीमध्ये ट्वेन्टी – 20 सामना

लय भारी न्यूज नेटवर्क

बारामती : राजकारणातील कसलेले फलंदाज अजितदादा पवार यांच्या विरोधात नव्या दमाचे गोपीचंद पडळकर मैदानात उतरले आहेत. बारामती मतदारसंघासाठी पडळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना प्रचारासाठी कसेबसे वीसेक दिवस मिळाले आहेत. त्यातील आठ दिवस आता उरले आहेत. कमी कालावधीत मैदान मारण्यासाठी पडळकर यांनी आता ट्वेन्टी – 20 सामान्यप्रमाणे धावा काढण्यावर भर दिला आहे.

 

बारामतीमध्ये शहरी भाग जसा आहे, तसा ग्रामीण व दुर्गम भाग सुद्धा आहे. या प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांनी वेगवान यंत्रणा कामाला लावली आहे. दिवसभर ते स्वतः कार्यकर्त्यांसोबत गावोगावी फिरत आहेत. ठिकठिकाणी कोपरा सभा आयोजित करीत आहेत. सामान्य लोकांसोबत बैठका घेत आहेत. त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. स्वतःची व भाजपाची भूमिका ते लोकांना सांगत आहेत. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष, धनगर समाजाच्या स्थानिक संघटनासुद्धा गावोगावी जाऊन प्रचार करीत आहेत.

बारामतीमध्ये पवार घराण्यांच्या विरोधात भाजपने गेल्या काही वर्षात पक्ष संघटन मजबूत केले आहे. पक्षाचे हे कसलेले कार्यकर्तेही गावोगावी पोहोचून पडळकरांचा प्रचार करीत आहेत. बारामतीमध्ये धनगर समाजाची लोकसंख्या मोठी आहे. पडळकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. त्यामुळे बारामतीमधील धनगर समाज पडळकरांसाठी जोरदार कष्ट घेत आहे.

हे सुद्धा वाचा

बारामती म्हणजे सोन्याची लंका

उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना टोला, डोळ्यात अश्रू आणून शेती करायचं म्हणताय, पण धरणात पाणी कुठंय ?

गोपीचंद पडळकरांवर टीका करू नका : अजित पवार

गोपीचंद पडळकरांमुळे महादेव जानकरांची पंचाईत

भाजपच्या धनगर नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी

पडळकर यांना वक्तृत्वशैलीची देणगी लाभलेली आहे. ते जिथे जातात, तिथे भाषण गाजवतात. गावोगावच्या त्यांच्या सभांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या भाषणामुळे तरूणांमध्ये ऊर्जा निर्माण होत आहे. कार्यकर्ते आणखी जोमाने काम करीत आहेत.

पडळकर यांच्याकडे स्वतःच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. हे सगळे कार्यकर्तेही जोरदार प्रचार करीत आहेत. सोशल मीडियावरूनही पडळकरांचा जोरात प्रचार सुरू आहे. फेसबुक, यू ट्यूब, वॉट्स अप या सामाजिक माध्यमांचा पडळकरांची सोशल मीडिया टीम खुबीने वापर करीत आहे.

पडळकर यांच्यासाठी बारामती मतदारसंघ नवीन असला तरी ते वेगवान फलंदाजी करीत आहेत. पडळकरांच्या दमदार फलंदाजीमुळे बारामतीचा सामना चुरसीचा होईल, अशी अटकळ बांधली जात आहे.

तुषार खरात

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

13 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

13 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

14 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

14 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

15 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

17 hours ago