महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त जनतेला वा-यावर सोडून सरकार सुट्टीवर: नाना पटोले

संपूर्ण राज्य दुष्काळात (drought-hit people) होरपळत असून माता भगिणींना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. शेतक-यांनी पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेल्या फळबागा वाळून गेल्या आहेत. जनावरांना चारा पाणी नाही. पशुधन जगवताना शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. दुष्काळी (drought-hit people) परिस्थितीचा सामना करत जगण्याचा संघर्ष करणा-या शेतक-याला वा-यावर सोडून सरकार सुट्टीवर गेले आहे. मुख्यमंत्री मूळगावी आराम करत आहेत तर कृषीमंत्री विदेश दौ-यावर आहेत. आता जनता यांना सत्तेवरून खाली खेचून सुट्टी देईल असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.(Govt on leave drought-hit people on leave: Nana Patole)

काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आज मराठवाडा दौ-यावर आहेत. आज त्यांनी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली आणि शेतकरी बांधवांशी संवाद साधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार कल्याण काळे, आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार नामदेव पवार, किरण पाटील डोणगावकर, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी मंञी अनिल पटेल, विनोद तांबे, रविंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पटोले (Nana Patole) म्हणाले की, जायकवाडीसारखे मोठे धरण असूनही पैठण तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे हे सरकारच्या गलथानपणाचे निदर्शक आहे. मोदींची हर घर नल योजना फक्त त्यांच्या भाषणात आहे. प्रत्यक्षात ती कुठेही अस्तित्वात नाही. या अडचणीच्या काळात केंद्र किंवा राज्य सरकारने शेतक-यांना मदत केली नाही. पीक कर्ज माफ करणे तर दूरच ऊलट बॅंका कर्ज वसुलीसाठी तगादा लावत आहेत. शेतक-यांकडून विम्याचा हप्ता भरून घेतला मात्र नुकसान भरपाई काही मिळाली नाही. सत्तेत बसलेल्या लोकांना मात्र जनतेचे काही देणेघेणे राहिले नाही. निधी आणि टक्केवारीच्या पलिकडे सत्ताधा-यांना कशाचेच काही देणेघेणे राहिले नाही. शेतक-यांनी खचून जाऊ नये काँग्रेस पक्ष आगामी विधानसभेत सरकारला जाब विचारून शेतक-यांना न्याय मिळवून देईल असे आश्वस्त करून शेतक-यांनी टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन पटोले (Nana Patole) यांनी केले.

संभाजीनगर नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बीडच्या गेवराई तालुक्यातील रुई येथील रेशीम उत्पादक शेतक-यांच्या शेतावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली यावेळी त्यांनी (Nana Patole) शेतक-यांच्या समस्यांची जाणिव करून देण्यासाठी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री दोघांनाही फोन लावला दोघांचेही फोन बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शेतकरी एवढ्या भयानक संकटात असताना सरकार मात्र सुट्टीची मजा घेत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला यावेळी उपस्थित शेतक-यांनीही सरकारच्या आणि प्रशासनाच्या अनास्थेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर पटोले (Nana Patole) यांनी जालना जिल्ह्यातील अंबड आणि बदनापूर तालुक्यातील विविध गावातील शेतात जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. या परिसरातील मोसंबी उत्पादक शेतक-यांना मोठा फटका बसला असून वर्षानुवर्षे पोटच्या लेकरांप्रमाणे जगवलेल्या बागा काढून टाकण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. पण सरकार मात्र ढिम्मच आहे. या भागातील शेतक-यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाई असून जनावरांसाठी चारा छावण्या सुरु नाहीत असे शेतक-यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या सर्व शेतक-यांच्या अडचणी जाणून घेत आगामी अधिवेशनात दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरून मदत करण्यास भाग पाडू असे आश्वासन दिले.

विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांना नाशिक जिल्ह्यातील गावांमध्ये जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली व शेतकरी बांधवांशी संवाद साधला तर प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान यांनी कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील गावांमधील शेतावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.

टीम लय भारी

Recent Posts

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

47 mins ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

3 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

3 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

4 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

4 hours ago

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

7 hours ago