टीम लय भारी
मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप खरे आहेत की, खोटे आहेत हे ठरविण्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपच्या परस्परविरोधी दाव्यानंतर खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख स्वता:च्या बचावासाठी पुढे आहे आहेत.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप करताना देशमुख आणि एसीपी पाटील यांच्यात भेट झाल्याचे सांगितले होते. या भेटीत देशमुख यांनी पाटील यांना कलेक्शनचे टार्गेट दिल्याचे परमबीर सिंग यांनी म्हटले होते. त्यासाठी पाटील यांच्यासोबत झालेल्या स्वत:च्या संभाषणाच्या व्हॉट्सअॅप चॅटचा पुरावा सिंग यांनी दिला होता. त्यात १६ मार्च ही तारीख नमूद करण्यात आली होती. परंतु, ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान अनिल देशमुख रुग्णालयात होते. त्यानंतर ते २७ फेब्रुवारीपर्यंत ते होम क्वारंटाइन होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितलं.
पवार यांच्या दाव्यानंतर भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी १५ फेब्रुवारी झालेल्या अनिल देशमुख यांच्या पत्रकार परिषदेचे ट्वीट केले. त्याचाच आधार घेत फडणवीसांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. त्यानंतर स्वत: देशमुख यांनी पुढे येऊन या संदर्भात खुलासा केला आहे तसेच परमबीर यांचे आरोप खोडून काढले आहेत.
‘कोविडची लागण झाल्यामुळे ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान मी अॅलेक्सिस रुग्णालयात होतो. तिथून १५ फेब्रुवारीला डिस्चार्ज झाला तेव्हा हॉस्पिटलच्या गेटवर अनेक पत्रकार उभे होते. त्यांना काही प्रश्न विचारायचे होते. नुकताच कोविडमधून बाहेर पडल्यामुळे माझ्या अंगात त्राण नव्हता. त्यामुळे गेटवरच खुर्चीवर बसलो आणि काही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यानंतर मी होम क्वारंटाइन झालो. १५ ते २७ फेब्रुवारी पर्यंत मी होम क्वारंटाइन होतो. २८ फेब्रुवारीला पहिल्यांदा घराबाहेर आलो,’ असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत संभ्रम कायम आहे.
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…