महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांच्या कमी वयाच्या पुतण्याला लस मिळतेच कशी? ; कॉंग्रेसचा प्रश्न

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचे संकट असताना राज्यात दुसरे संकट आले ते म्हणजे लसचा आणि रेमेडिसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. राज्यावर कोरोनाचे मोठे संकट असून, सत्ताधारी आणि विरोधक या संकटाच्या काळातही एकमेकांवर चिखलफेक करण्यात गुंतलेत आहेत. रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली, तर आता काँग्रेसने ही देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याने लस घेण्यावरून निशाणा साधला आहे.

तन्मय फडणवीस याने कोरोनाची लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू तन्मय फडणवीस याने कोरोनाची लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय, त्याच फोटोवरून आता महाराष्ट्र काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांना कचाट्यात पकडले आहे. ४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे. असे असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?, असा सवालच काँग्रेसने उपस्थित केला आहे. भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का!, असेही टीकास्त्र काँग्रेसने ट्विट करत सोडले आहे.

तन्मय फडणवीस माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू

तन्मय फडणवीस माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून, त्याचे वय २५ वर्षांहून अधिक नाही. नागपुरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे त्याने लस घेतल्याचा ‘फोटो’ सोमवारी ‘सोशल मीडिया’ वर ‘व्हायरल’ झाला होता. परंतु विरोधकांकडून टीका होताच तो फोटो हटवण्यात आला होता. परंतु तोपर्यंत अनेकांनी त्या फोटोचे स्क्रीन शॉट घेतले होते. तोच फोटो ट्विट करत काँग्रेसने आता देवेंद्र फडणवीसांनाच घेरले आहे.

Rasika Jadhav

Share
Published by
Rasika Jadhav

Recent Posts

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

4 mins ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

23 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago