कोरोना : जामखेड शहर हॉटस्पॉट केंद्र जाहीर

टीम लय भारी

अहमदनगर : कोरोनाचा ग्रामिण विभागात शिरकाव झाला आहे. त्याला रोखण्यासाठी सरकार दरबारी कडक पाऊले उचलण्यात आली आहेत. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहर, मुकूंदनगर (अहमदनगर शहर), आलमगीर (अहमदनगर तालुका) नाईकवाडापुरा (संगमनेर शहर) हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

या क्षेत्राच्या मध्यबिंदु पासुन जवळपास 2 कि.मी.चा परिसर हा कोअर एरिया म्हणून घोषित करण्यात आला असून या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा वस्तु विक्री इत्यादी दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेपासून दिनांक 14 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज हे आदेश जारी केले आहेत. या क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच या क्षेत्रातून वाहनांची ये -जा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

साथ रोग अधिनियम 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी  द्विवेदी यांनी आज हे आदेश जारी केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी, यात, सार्वजनिक ध्वनिक्षेपकाद्वारे या आदेशाबाबत संबंधीत क्षेत्रातील नागरिकांना अवगत करावे, कंट्रोल रुम स्थापन करुन 24 x 7 कार्यरत ठेवावी. या ठिकाणी 3 ते 4 अधिकारी / कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येवून प्रत्येक शिफ्टमध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक प्रसिध्द करण्यात यावेत. कंट्रोल रुम मध्ये रजिस्टर ठेवून त्यामध्ये नोंदी घेण्यात याव्यात व नागरीकांना आवश्यक ते जीवनावश्यक वस्तु सशुल्क पुरविण्यात यावे. तसेच प्राप्त होणा-या सर्व तक्रारींचे निरसन करण्यात यावे. सदर क्षेत्रातील रहिवाशी यांना आवश्यक असणा-या बाबी जसे दुध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्यादी बाबी योग्य ते शुल्क आकारुन शासकीय यंत्रणेमार्फत पुरविण्यात याव्यात. त्याकामी जीवनावश्यक वस्तुंचे व्हेंडर पथके तयार करुन खरेदी व विक्री, वाहतुक इत्यादी बाबींचे सुक्ष्म नियोजन करावे, असे या आदेशात म्हटले आहे.

अहमदनगर महानगरपालीका हद्दीमध्ये आयुक्त, म.न.पा.अहमदनगर तसेच आलमगीर (अहमदनगर तालुका), नाईकवाडापुरा (संगमनेर शहर), जामखेड शहर या ठिकाणी संबंधीत उपविभागीय अधिकारी हे सनियंत्रण अधिकारी
म्हणून कामकाज पाहतील.

या क्षेत्रातील सर्व बँकांनी बँकींग सुविधा बँक प्रतिनिधी मार्फत मार्फत उपलब्ध करुन द्याव्यात. पोलीस विभागाने सर्व पर्यायी रस्ते बंद करुन एकच रस्ता Movable Barricades द्वारे खुला ठेवावा. सदर क्षेत्रामध्ये सेवा देणा-या सर्व शासकीय कर्मचारी यांना संबंधीत सनियंत्रण अधिकारी यांनी ओळखपत्र द्यावेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

हॉटस्पॉट केंद्र जाहीर केलेल्या या प्रतिबंधीत भागामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने येथील
नागरीकांच्या हालचालींवर निर्बंध आणणे आवश्यक ठरले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना विविध कारणांसाठी शासकीय आस्थापनांकडून देण्यात आलेल्या वाहन वापर व वाहतुकीची सवलत रद्द करण्यात येत आहे. या क्षेत्रातील इतरत्र कर्तव्यार्थ असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधीत क्षेत्रातून कर्तव्याच्या ठिकाणी जाणे आवश्यक असल्यास, अशा व्यक्तींची त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी वास्तव्यची सुविधा संबंधीत आस्थापनांनी उपलब्ध करुन द्यावी. जेणेकरुन कोरोना संक्रमणशील क्षेत्रातील त्यांच्या हालचालींवर निर्बंध घालणे शक्य होईल, असे आदेशात स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.

कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात म्हटले आहे.

राजीक खान

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

15 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

16 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

17 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

17 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

18 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

18 hours ago