महाराष्ट्र

Lay Bhari : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत धमक्या आणि गुंडगिरी; मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी

टीम लय भारी

पुणे : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आता धमक्या आणि गुंडगिरीचा शिरकाव (Lay Bhari) झाला आहे. मनसेच्या पुणे पदवीधरच्या उमेदवार रूपाली पाटील यांना सातारा जिल्ह्यातून एका तरुणाने फोन करून ‘जिथे असशील तिथे संपवून टाकू. आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस’ अशी धमकी दिल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तपास करून धमकी देणा-याला अटक करण्याची मागणी रूपाली पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.

राज्यभरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमधून उमेदवार निवडून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. या निवडणुकीमध्ये रंग भरण्यास सुरुवात झाली असून उमेदवारांचा प्रचारही सुरू झालेला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन पदवीधरांच्या भेटीगाठी घेणे, प्रचार करणे अशी कामे करीत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला अध्यक्षा रूपाली पाटील या मनसेकडून पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी नुकताच सातारा जिल्ह्याचा दौरा केलेला आहे.

शनिवारी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून अज्ञात नंबरवरून फोन आला. ‘मी सातारा जिल्ह्यातून लबाडे बोलत असून, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस. अन्यथा पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू.’ अशी धमकी दिली. पाटील यांचा फोन त्यांच्या सहकारी महिलेकडे होता. या फोनमुळे ही सहकारी महिला प्रचंड घाबरली. यासंदर्भात रूपाली पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोनवरून धमकी मिळाली असून मी असल्या धमक्यांना घाबरत नाही. यासंदर्भात पुणे पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केल्याचे सांगितले.

अभिषेक सावंत

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

11 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

11 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

12 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

13 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

13 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

15 hours ago