महाराष्ट्र

…या कारणासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

टीम लय भारी

मुंबई :- देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. याच संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. इतकचे नाही तर मोदींना लाहिलेल्या या पत्रामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरातील १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची तातडीने परवानगी देण्यात यावी अशी मागणी ही केली आहे. या पत्रामध्ये असोसिएशनने सहा महत्वाचे मुद्दे मांडले असून त्यांची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्धचा लढा सुरु असतानाच देशामध्ये करोनाची दुसरी लाट आली असल्याचे सांगताना खेद होत आहे, असे म्हटले आहे. तसेच पुढे देशामध्य सध्या सात लाख ४० हजार अॅक्टीव्ह कोरोना रुग्ण असल्याचे ही इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे. करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर चार एप्रिल २०२१ रोजी पहिल्यांदाच एका दिवसात एक लाखांहून अधिक कोरोना रुग्ण २४ तासांमध्ये आढळून आले. ही कोरोनाची साथ सुरु झाल्यानंतरची सर्वात मोठी वाढ आहे, असे ही कोरोना परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त करताना देशातील डॉक्टरांच्या या सर्वात मोठ्या संस्थेने म्हटले आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे साडेतीन लाख सदस्य भारत सरकारने सुरु केलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये पूर्णपणे भारत सरकारच्या पाठीशी असल्याचे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. भारत सरकारने हाती घेतलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये पहिल्या फळीतील कोरोना योद्धे आणि सर्वसामान्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने करोनाबाधितांची ओळख पटवून त्यांना ट्रेस करुन त्यांच्यावर उपचार करण्यासंदर्भात ज्या सुचना जारी केल्यात त्याप्रमाणे काम केले जात आहे. परंतु मोठ्या प्रमाणात लोक मास्क न घातला एका जागी गर्दी करतात, कोरोनासंदर्भातील नियम पाळत नाहीत, कोरोना विषाणूमध्ये सतत बदल होत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची मेहनत निष्फळ ठरत असून दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याचे सोसिएशनने म्हटले आहे.

सध्या कोरोना नियम न पाळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई, मोठ्या प्रमाणात बेड्स आणि ऑक्सिजनची सुविधा असणारे बेड्स उपलब्ध करुन देणे, आरोग्य कर्मचाऱ्यांना धीर देत त्यांचा उत्साह वाढवणे. त्याचप्रमाणे नियमानुसार संपूर्ण उपचार करुन घेणे या गोष्टींवर सध्याच्या काळात भरे देणे गरजेचे आहे, असे ही असोसिएशनने पत्रात नमूद केले आहे.

आतापर्यंत देशामध्ये ७ कोटी ९१ लाख व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली असून त्यापैकी ६ कोटी ८६ लाख व्यक्तींना पहिला डोस तर एक कोटी पाच लाख व्यक्तींना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. सध्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. परंतु ज्या वेगाने संसर्ग होत आहे ते पाहता आम्ही तुम्हाला विनंती करतो की, लसीकरणाची गती वाढवली पाहिजे आणि १८वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची परवानगी देण्यात आली पाहिजे.

सर्व नागरिकांना घरापासूनच चालत जाता येईल अशा अंतरावर कोरोना लसीकरण केंद्र उपलब्ध करुन दिले पाहिजे. तसेच लसीकरणासाठी खासगी क्लिनिक आणि रुग्णालयांचीही मदत घेतली पाहिजे. प्रत्येक डॉक्टरकडे लसीकरणाची सोय असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम लसीकरणावर दिसून येईल असा विश्वास असोसिएशनने व्यक्त केला आहे. जिल्हा स्तरावर कोरोना लसीकरण टास्क फोर्स टीम तयार करुन त्यामध्ये सरकारी तसेच खासगी व्यक्तींची मदत घेऊन तळागाळातील व्यक्तींपर्यत लसीकरण पोहचवण्याची व्यवस्था उभारली पाहिजे. यासाठी असोसिएशन आणि त्यामधील सभासद काम करण्यासाठी तयार आहेत, असे असोसिएशनने पंतप्रधानांना या पत्रातून कळवले आहे.

सार्वजनिक ठिकाणी फिरता लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले पाहिजे. तसेच हे प्रमाण पत्र असेल तरच राशन आणि इतर सार्वजनिक सुविधा देण्याचा नियम तयार केला पाहिजे अशी मागणी ही असोसिएशनने केली आहे. सध्या कोरोनाची साखळी मोडण्यासाठी अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या म्हणजेच चित्रपट, संस्कृतीक आणि धार्मिक तसेच क्रीडा या क्षेत्रातील कार्यक्रमांवर तात्पुरत्या स्वरुपात बंदी घालण्यात यावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

14 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

15 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

16 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

17 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

17 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

17 hours ago