महाराष्ट्र

‘या’ शहरात लॉकडाऊन? आरोग्यमंत्री राजेश टोपे

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघूनच आरोग्यमंत्री राजे टोपे यांनी लॉकडाऊबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. लॉकडाऊन हा शेवटचाच पर्याय असतो त्यामुळे याबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

मुंबई, पुणे, नागपुर या तीन प्रमुख शहरांत झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे राजेश टोपे यांनी याआधीच काही शहरात कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे म्हटले होते. तर, उद्या मंत्रिमंडळाची बैठक असून या बैठकीत कोरोना परिस्थितीबाबत काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

‘लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मला असे वाटतं की, मुख्यमंत्र्यांनाच लॉकडाऊनचा अधिकार असतो. महाराष्ट्राच्या आरोग्याचा हिताचा तसेच इतर परिणामांचा विचार करुन वरिष्ठ मंडळी चर्चा करतील आणि निर्णय घेतील. लॉकडाऊन हा खरे तर शेवटचा पर्याय असतो त्यामुळे याबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल,’ असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

‘पुणे, मुंबई, नागपूर या शहरांत रुग्णसंख्या वाढत असल्याने तिथं निर्बंध कठोर करणे गरजेचे आहे. गर्दी होताच कामा नये हे पाहणे आवश्यक आहे. मास्क, सोशल डिस्टनसिंग यासगळ्या गोष्टी काळजीपूर्वक हाताळल्या पाहिजेत, अशी शासनाची अपेक्षा आहे आणि अशा प्रकारेच प्रादुर्भाव नियंत्रणात आणला जाऊ शकतो,’ असे ही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

‘मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी चर्चा करुन पत्र काढले आहे. ज्यामध्ये त्यांनी लोकांनी योग्य प्रतिसाद दिला नाही तर रेल्वेच्या बाबतीत योग्य ते विचार करावा लागेल असे सांगितले आहे. त्यामुळे मुंबई पालिका आयुक्त मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेतील,’ असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

17 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

19 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

19 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

20 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

21 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

21 hours ago