Uddhav Thackeray :‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ताई म्हटले, अन् भाऊच बोलतोय असे वाटले’

टीम लय भारी

नवी दिल्ली :  ‘ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची सगळी जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेईल असा विश्वास देणारा फोन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी केला. त्यांनी ताई म्हटले आणि मला माझा भाऊच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्यासारखे वाटले. मुख्यमंत्री सरांनी मला मदत केली. मी आताच महाराष्ट्र सदन मध्ये राहण्यासाठी आले. आता मुंबईला कधीही जायला मिळो. मला आताच घरी आल्यासारखे वाटतेय. माझ्या लोकांमध्ये आल्यासारखे वाटतेय…’ इस्त्राईलहून दिल्लीला परतलेल्या पण लॉकडाऊनमुळे ( Lockdown21 ) तिथेच अडकून पडलेल्या एलिझाबेथ पिंगळे आनंदाने सांगत होत्या.

एलिझाबेथ पिंगळे या मुलूंडच्या रहिवाशी आहेत. आजारी वडिलांना भेटायला इस्त्राईलला गेल्या होत्या. दुर्देवाने वडिलांचे निधन झाले आणि त्यांचे तेथील वास्तव्य लांबले. त्या २१ मार्च रोजी निघून २२ मार्चला नवी दिल्लीत पोहोचल्या. संध्याकाळी मुंबईचे विमान होते. परंतु त्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितले गेले. त्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन झाल्या. १४ दिवसानंतर अचानक हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना हॉटेल बंद होत असल्याचे कारण सांगत त्यांची सोय दुसऱ्या हॉटेलमध्ये केली व ते पसंत नसल्यास स्वत:ची व्यवस्था स्वत: करण्यास सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री ( Uddhav Thackeray ) त्यांच्या मदतीला धाऊन गेले.

श्रीमती एलिझाबेथ यांनी स्वत:सह महाराष्ट्रातील ४० जण येथे अडकले असून  या सर्वांना मदत करावी असा संदेश देणारा व्हिडिओ तयार करून तो व्हॉटसअप वर टाकला. या व्हिडिओची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी एलिझाबेथ पिंगळे यांच्याशी नवी दिल्ली येथे दूरध्वनीहून संपर्क साधला आणि त्यांची व्यवस्था महाराष्ट्र सदन येथे करण्यात येत असल्याचे सांगितले. १४ दिवसांच्या क्वारंटाईननंतर आणि आरोग्य विभागाच्या मान्यतेनंतर आज त्या महाराष्ट्र सदन येथे सुखरूप पोहोचल्या.

‘तुम्ही एकट्या नाहीत, घाबरून जाऊ नका, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. हे सांगणारा आश्वासक संवाद आणि पुढे केलेला मदतीचा हात पाहून मी खुप भारावून गेले आहे. आपल्याच माणसांनी इतकी आस्थेवाईकपणे चौकशी केली. माझी व्यवस्था केली. मी त्या सगळ्यांची विशेषत: मुख्यमंत्री ( Uddhav Thackeray ), त्यांचे प्रधान सचिव विकास खारगे सर, महाराष्ट्र सदनातील आणि इतर अधिकारी या सगळ्यांची खूप आभारी आहे, अशा भावना पिंगळे यांनी व्यक्त केल्या.

क्वारंटाईन कालावधी संपलेल्या महाराष्ट्रातील रहिवाशांची सदनात सोय – समीर सहाय 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या सुचनेनुसार परदेशातून नवी दिल्ली येथे आलेल्या आणि क्वारंटाईन होण्यास सांगितलेल्या परंतु आता क्वारंटाईन कालावधी संपला आहे आणि त्यांना आरोग्य विभागाने घरी जाण्यास मान्यता दिली आहे अशा महाराष्ट्रातील सर्व रहिवाशांची लॉकडाऊन संपेपर्यंतच्या कालावधीसाठी महाराष्ट्र सदन येथे व्यवस्था करण्यात  आल्याची माहिती महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त समीर सहाय यांनी दिली आहे.

ते म्हणाले की, विविध देशातून महाराष्ट्रात जाण्यासाठी आलेले नागरिक क्वारंटाईनमुळे आणि नंतर लॉकडाऊनमुळे राज्यात परत जाऊ शकले नाहीत यात इटलीहून परतलेले १५ विद्यार्थीही आहेत. या सर्वाची लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत महाराष्ट्र सदनात व्यवस्था करण्यात आली आहे. काही जण राहण्यासाठी सदनात आले देखील आहेत. उर्वरित लोक त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर आरोग्य विभागाच्या मान्यतेने सदनात दाखल होणार आहेत असेही ते म्हणाले. उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने  महाराष्ट्रातील रहिवाशांची अशा पद्धतीने नवी दिल्ली येथे व्यवस्था करणारे महाराष्ट्र सदन हे एकमेव सदन ठरले आहे, अशी माहिती ही त्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

WarAgainstVirus : जादा दराने वस्तू विकणार्‍या दुकानदारांना सरकारचा कारवाईचा इशारा

PoliceAction : सोशल मीडियात मुस्लिमांबद्दल विद्वेष पसरविणाऱ्या अंध भक्ताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Coronavirus : मोदी समर्थकांचा कळस : शिवराय, महात्मा गांधीं, डॉ. आंबेडकरांच्या कार्यासोबत ‘मेणबत्त्या इव्हेन्ट’ची तुलना

कोरोनाबाबत केंद्र सरकारने प्रसारित केलेली माहिती

तुषार खरात

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

4 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

5 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

5 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

6 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

8 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

8 hours ago