मागासवर्गीय असल्यानेच छगन भुजबळांबद्दल खालच्या पातळीवरची भाषा: नाना पटोले

राज्यातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल ज्या पद्धतीने अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरण्यात आली, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेले भुजबळ हे मागासवर्गीय समाजाचे आहेत म्हणूनच त्यांच्याबद्दल शिविगाळ करणारी भाषा वापरण्यात आली आहे, ही मानसिकता भारतीय जनता पक्षाची आहे. भुजबळांबद्दल जी भाषा वापरली त्याबद्दल सरकारने माफी मागावी आणि हिम्मत असेल तर सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाडांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-भाजपा-पवार सरकारवर तोफ डागली.

सरकार राज्यात जाणीवपूर्वक ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच मराठा अध्यादेशाला विरोध असून ते कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हा काय तमाशा चालवला आहे? भाजपाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले आहे यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आमची लढाई सुरु आहे.

प्रकाश आंबेडकरांशी सकारात्मक चर्चा..
महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरही उपस्थित होते, त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. चर्चेत आंबेडकर यांनी काही मुद्दे मांडले आहेत, त्यांचे व आमचे अनेक मुद्दे समान आहेत यातूनच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याचा निर्णय झाला असून किमान समान कार्यक्रम ठरवला जाईल, या समितीत सर्व घटक पक्षांच्या सदस्यांचा समावेश असेल. आठ दिवसात ही समिती अहवाल सादर करेल व त्यानंतर पुढील आठवड्यात मविआच्या बैठकीत जागा वाटपावरही चर्चा होईल. जागा वाटपावर महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, सर्व ४८ जागा मविआ लढणार असून सर्वात जास्त जागांवर मविआचा विजय होईल.
पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, इंडिया आघाडीत बिहारमध्ये जे घडले ते सर्वांना माहित आहे, नितीशकुमार यांनी यापूर्वीही असा दलबदल केला आहे. बिहारमध्ये काँग्रेस व लालू प्रसाद यादव यांच्या राजद पक्षाची मोठी ताकद आहे म्हणूनच भाजपाचे दोन कार्यकर्ते ईडी व सीबीआयकडून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे परंतु भाजपाला याचे परिणाम भोगावे लागतील, असेही नाना पटोले.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्यात ओबीसी आरक्षणात वाटा देण्यावरून खडाजंगी चालू आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर उभय नेत्यांमधील वाद विकोपाला गेला असून जरांगे पाटील यांनी थेट मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा केली. ज्या मंडल आयोगामुळे ओबीसींना आरक्षण वाढवून मिळाले आणि ज्या ओबीसी प्रवर्गात जरांगे पाटील आरक्षण मागत आहेत, त्यालाच ते आव्हान कसे काय देऊ शकतात? असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी एक्सवर पोस्ट टाकून विचारला आहे.

टीम लय भारी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

2 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

4 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

6 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

8 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

9 hours ago