Drug Connection l भारती सिंग आणि पती हर्ष तुरुंगाबाहेर

मुंबई l ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग Bharti Singh  तिचा नवरा हर्ष लिंबाचिया Harsh Limbachiyaa यांना दिलासा मिळाला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने दोघांचा जामीन मंजूर केला आहे, त्यामुळे या दोघांनाही आजची रात्र तुरुंगात घालवावी लागणार नाही.

आज सोमवार  (23 नोव्हेंबर) त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली. भारती आणि हर्ष यांच्या जामीन अर्जावर NCB आपले उत्तर आज दाखल करुन सुनावणीसाठी पुढील तारीख मागणार होते.

NCB ने शनिवारी केली होती दोघांना अटक

अंमली पदार्थ विरोधी पथकाने NCB भारती सिंगच्या घरावर शनिवारी छापा टाकला होता. त्यावेळी तिच्या घरात अंमली पदार्थ आढळून आल्यामुळे एनसीबीने शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष यांनी अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर एनसीबीने एनडीपीएस कायदा 1985, कलम 20 अ, 20 ब 2 आणि 27 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. या दोघांनाही मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयाने 14 दिवसांची म्हणजे 4 डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली होती. भारती आणि हर्षने जामीनासाठी अर्ज केला होता, त्यावर आज सुनावणी झाली.

कसे समोर आले होते भारती आणि हर्षचे नाव?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण समोर आले. एनसीबीने शनिवारी सकाळी खार दांडा परिसरात छापा घातला होता. कारवाईत अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून 15 एलएसडी डॉट्स, 40 ग्रॅम गांजा आणि नायट्रोझेपाम औषध आदी अंमली पदार्थ एनसीबीने हस्तगत केले होते. त्याच्या चौकशीतून भारती आणि तिच्या नव-याचे नाव समोर आले होते.

राजीक खान

Recent Posts

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 hour ago

नवरात्रीच्या उपवासात शेंगदाणे खाण्याचे फायदे, जाणून घ्या

3 ऑक्टोबर 2024 पासून देशभरात नवरात्रीचा सण सुरू होत आहे, आणि हा सण 11 ऑक्टोबर…

2 hours ago

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…

3 hours ago

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

23 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

23 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

24 hours ago