महाराष्ट्र

डोंबिवली एमआयडीसीमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट, धुराचे प्रचंड लोट

डोंबिवली एमआयडीसीत (Dombivli MIDC) केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्फोटानंतर कंपनीत भीषण आग (Massive boiler)लागली. यात ३ जण ठार झालेत. तर स्फोटात पाच ते सहा कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीनंतर धुराचे लोट (plume of smoke) दूरवरुनही पाहायला मिळत होते. परिसरातील इमारतींच्या काचाही फुटल्याची माहिती आहे. या घटनेमुळं डोंबिवली भागात खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण पसरलंय. डोंबिवली अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.(Massive boiler explosion in Dombivli MIDC, huge plume of smoke)

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल : स्फोटामुळं अनेक वाहनांचे आणि घरांचे नुकसान झाले आहे. तर घटनास्थळी आगीवरती नियंत्रण मिळवीण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान दोन फायर वाहनासह उपस्थित आहेत. तसेच डोंबिवली अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहनासह उपस्थित आहेत. कल्याण (पु.) अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहनासह उपस्थित आहेत. कल्याण (प.) अग्निशमन दलाचे जवान दोन फायर वाहनासह उपस्थित आहेत. पलावा एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहनासह उपस्थित आहेत. ठाणे अग्निशमन दलाचे जवान एक हायराईज फायर वाहनासह उपस्थित आहेत.

केमिकल कंपनीमध्ये दुपारी एकच्या सुमारास स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर जवळच्या कंपन्यांनाही आग लागल्याचं समोर आलं. हा स्फोट इतका भीषण होता की हवेत धुराचे लोळ दिसत होते. आजूबाजूलाही काही दिसत नव्हतं. या स्फोटामुळं दीड किलोमीटर परिसर हादरुन गेला, दीड किलोमीटरमधील गाड्यांच्या आणि बिल्डिंगच्या काचा फुटल्या आहेत. लोक भूकंप आला त्याप्रमाणे पळत होते. आजुबाजूच्या परिसरातील एकाही सोसायटीच्या काचा राहिलेल्या नाहीत, सगळ्या काचा तुटून गेल्या आहेत. बॉयलर्सचे जे तुकडे उडाले ते दीड किलोमीटर अंतरावर पडले.हा स्फोट शक्तिशाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता स्फोटात किती जीवितहानी झाली आहे, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सध्या याठिकाणी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. या दुर्घटनेत सहा ते सात कामगार गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे.

याठिकाणी अजूनही स्फोट सुरु असल्याचेही समजते. त्यामुळे ही आग आणखी दूरवर पसरण्याची शक्यता आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आग नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, सध्या एमआयडीसीच्या आजुबाजूच्या परिसरात स्फोटाच्या हादऱ्याने पडझड झाल्याचे दिसत आहे.

टीम लय भारी

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

4 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

4 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

6 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

6 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

6 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

8 hours ago