टीम लय भारी
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकावर जोरदार टीका केली होती. त्याला सत्ताधा-यांकडूनही जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले. त्यानंतर आता राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनीही निशाणा साधला आहे.“फडणवीस साहेब, थोडं शांत बसा आणि सरकारचं काम बघत रहा,” असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला अपयश आलं आहे असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होत असलेल्या आरोपांवरून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी टोला लगावला आहे. “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत. त्यांना ‘मौनंम सर्वार्त साधनम्’, ‘मौनव्रताने मनाची शांती लाभते’ आणि ‘प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय,’ अशी तीन पुस्तके भेट देणार आहे. फडणवीस साहेब थोडं शांत बसा आणि सरकारचं काम बघत रहा,” असा टोला मुश्रीफ यांनी फडणवीसांना लगावला आहे.
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…