आमदार रोहित पवारांनी विधानसभेत मांडला जामखेडचा पाणी प्रश्न

लय भारी न्यूज नेटवर्क 

जामखेड  : दिवसेंदिवस चाळीस हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या जामखेड शहराचा पाणी प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मागील सरकारच्या काळात सरकारकडे उजनी बॅकवाॅटर परिसरातून जामखेड शहरासाठीची सुमारे सव्वासे कोटी रूपये खर्चाच्या नव्या पाणी योजनेसाठी प्रयत्न झाले परंतू प्रत्यक्षात निधी मंजुरीसह अनेक अडचणींच्या गर्तेमुळे योजनेला मंजुरी मिळाली नाही. महाविकास आघाडीच्या सरकारने जामखेडचा पाणी प्रश्न कायम स्वरूपी निकाली काढावा याकरिता आमदार रोहित पवार सरसावले असुन त्यांनी नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात जामखेड शहराच्या पाणी प्रश्नांवर आवाज उठवत जामखेड शहराच्या पाणीपुरवठा योजनेला तातडीने मंजुरी देण्याची जोरदार मागणी सभागृहात सरकारकडे केली.

सध्या नागपुर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातून प्रथम निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदार रोहितदादा पवार यांनी विकासापासुन वंचित असलेल्या कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर जोरदार आवाज उठवत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. आमदार पवार यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरु असताना या चर्चेत सहभागी होऊन कर्जत-जामखेड या माझ्या मतदारसंघातील पीक विमा, अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान, कर्जमाफी, हळगाव कृषी महाविद्यालयाचा प्रलंबित प्रश्न, प्रकल्पग्रस्तांच्या वर्ग २ च्या जमिनींचा प्रश्न, वाळू उपसा, चारा छावण्यांचे अनुदान, रस्ते, जामखेड शहराचा पाणीपुरवठा तसेच कर्जत शहरातील गोदड महाराज मंदिर परिसराचा विकास या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले.

पुरवणी मागण्यांच्या चर्चेत सहभागी झालेले आमदार रोहित पवार यावेळी विधानसभेत बोलताना म्हणाले की, फळबाग विमा योजनेतून लिंबू, पेरु आणि द्राक्ष यांना वगळल्यामुळे मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे कोणतंही पीक फळबाग विमा योजनेतून वगळू नये तसेच विमा कंपनी आणि प्रशासन यांच्यातील तांत्रिक अडचणीमुळे २०१७-१८ सालच्या पिकविम्याची प्रलंबित रक्कम तातडीने देण्याची मागणी केली. अवकाळी पावसामुळे आणि पुरामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई तातडीने देण्याची मागणीही यावेळी केली. कुकडी, उजनी आणि सीना प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनी वर्ग २ च्या असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे या जमिनींचे वर्ग १ मध्ये रुपांतर करण्याची मागणीही यावेळी पवार यांनी केली.

दरम्यान पुढे बोलताना पवार यांनी मतदारसंघात मागील भीषण दुष्काळ पडला होता. त्याकाळात शासनाने चारा छावण्या सुरू केल्या होत्या. छावण्या देताना तत्कालीन सरकारने भेदभाव केला. ज्यांना छावण्या मिळाल्या त्यांनी सत्तेचा दुरूपयोग करत शेतकर्यांना त्रास देण्याचे काम केले. दरम्यान छावणी चालकांचे अनुदान रखडल्याने अनेक छावणी चालक आर्थिक संकटात आहेत. ज्या छावणी चालकांनी नियमानुसार चारा छावण्या चालवल्या आहेत त्यांना तातडीने प्रलंबित अनुदान देण्यात यावे आणि नियमभंग केलेल्या छावण्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीकडेही सभागृहाचे लक्ष वेधले.

राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता मतदारसंघातील प्रलंबित सर्वच प्रश्न लगेच चुटकीसरशी सुटतील अशी माझीही अपेक्षा नाही, परंतु यापैकी विधानसभेत मांडलेले बहुतांश प्रश्न कसे सुटतील यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. महाआघाडीचं सरकार हे आपल्या सर्वांचंच सरकार असल्यामुळे हे सगळे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.

 – आमदार रोहित पवार

रोहित पवार पुढे म्हणाले, मागील सरकारने कर्जमाफीची घोषणा केली खरी, परंतु मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला नाही. शिवाय दिड लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांन दिड लाखावरील कर्जाची रक्कम भरुनही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यांना तातडीने पैसे देण्याची मागणी करत कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांच्या पंचायत समित्यांच्या इमारतींची पुनर्बांधणी करण्याचीही मागणी केली. त्याचबरोबर मतदारसंघातील अनेक गावांच्या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब आहे. ग्रामविकास विभागाकडून याकडे तातडीने लक्ष देण्यात यावे, शिवाय कर्जतचे ग्रामदैवत असलेले संत श्री गोदड महाराज मंदिर परिसराचा तिर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करण्याची मागणीही केली.

कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचेही काम लवकर पूर्ण करण्याची मागणी

जामखेड तालुक्यातील हळगाव येथे मागील तीन वर्षांपासून शासकीय कृषी महाविद्यालयाचे काम सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण करावे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अन्यत्र जाण्याची गरज पडणार नाही याकडेही आमदार पवार यांनी सरकारचे लक्ष वेधले.

हे सुद्धा वाचा

मंत्रीमंडळात अशोक चव्हाण यांचा समावेश होणार, पृथ्वीराज चव्हाणांवर मात्र टांगती तलवार

VIDEO : रोहित पवारांचे विधानसभेत पहिलेच भाषण, भाजपवर केला हल्लाबोल

शरद पवारांच्या गनिमी काव्याने ‘शेतकरी कर्जमाफी’, आक्रस्ताळ्या भाजपची मात्र फजिती

रोहित पवारांनी घेतली वन अधिकाऱ्यांची भेट

VIDEO : आमदार रोहित पवार मंत्रीपदाबाबत म्हणतात, मतदारसंघासह राज्याची सेवा करता आली तर आनंदच

आमदार रोहित पवार लागले कामाला : मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वरिष्ठ अधिकार्यांसोबत भेटींचा सपाटा

तुषार खरात

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

3 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

3 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

3 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago