महाराष्ट्र

मनसेचे नांदेड जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांचे निधन

टीम लय भारी

मुंबई :- मनसेचे नांदेड जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रकाश कौडगे यांच्यावर हैद्राबादमधील रुग्णालयात उपाचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकाश कौडगे यांना बाळासाहेबांचा वाघ म्हणून देखील ओळखले जात होते. प्रदीर्घ काळ कौडगे यांनी शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख पद भूषवले होते. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता.

राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेप्रवेश

प्रकाश कौडगे यांनी ३१ डिसेंबर २०२० रोजी मनसेत प्रवेश केला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कौडगे यांचा अधिकृत पक्षप्रवेश झाला होता. पक्ष प्रवेशासोबतच राज ठाकरे यांनी कौडगे यांच्यावर मनसेच्या नांदेड जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती. नायगांव, भोकर आणि हदगांव या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला रामराम

नांदेडमध्ये सुरुवातीच्या काळात कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या कौडगे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यांच्या मनसेप्रवेशामुळे नांदेडमध्ये मनसेची ताकद वाढल्याचेही बोलले जात होते. त्यांच्या निधनाबद्दल मान्यवरांनी शोक प्रगट केला आहे.

प्रकाश कौडगे कोण होते?

नांदेड जिल्ह्यातील प्रकाश कौडगे यांचे मोठे नाव आहे. नांदेडच्या सामाजिक आणि राजकीय पातळीवर त्यांचा चांगला दबदबा होता. प्रकाश कौडगे शिवसेनेचा मोठा चेहरा म्हणून नावाजलेले होते. परंतु, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेना पक्षाकडून तिकीट मिळाले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या प्रकाश कौडगे यांनी वेगळा मार्ग अवलंबत अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता. त्यांच्या या बंडखोरीचा बराच फटका शिवसेनेला बसला होता.

शिवसेनेचे प्रदीर्घ काळ जिल्हाप्रमुख राहिल्याचा विक्रम कौडगे यांच्या नावावर होता. नांदेड जिल्ह्यातील समस्यांसाठी कौडगे यांनी एकेकाळी अनेक आंदोलने केली होती. लिंगायत समाजाच्या मागण्यासाठी ते कायम अग्रेसर राहायचे. तरुणांना आपलेसे करुन घेऊन त्यांचे संघटन करण्यात कौडगे निष्णात होते.

Rasika Jadhav

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

6 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

7 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

7 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

1 week ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

1 week ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

1 week ago