महाराष्ट्र

बंगाल निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची मोठी घोषणा, सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीसाठी बनवणार हाय लेव्हल कमिटी

टिम लय भारी

मुंबई : मोदी सरकारने (Modi government) नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती साजरी करण्यासाठी एक उच्च स्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही उच्च स्तरीय समिती 23 जानेवारी, 2021 पासून सुरू होणार्‍या एक वर्षाच्या स्मरणोत्सवाच्या कार्यक्रमांवर निर्णय घेईल. उच्च स्तरीय समितीचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतील. हे वर्ष श्रद्धांजली वर्ष म्हणून आयोजित केले जाईल आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात नेताजींच्या महान योगदानासाठी आभार मानले जातील.

नेताजी बोस यांच्याबाबत बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, भारत नेहमी सुभाष चंद्र बोस यांच्याप्रती त्यांचे धाडस आणि वसाहतवादाला विरोध करण्याच्यातील योगदाना बद्दल आभारी राहील. ते एक असे शूरवीर होते, ज्यांनी प्रत्येक भारतीयाला प्रतिबद्ध केले की, ते सन्मानाचे जीवन जगतात. सुभाष बाबू आपली बौद्धिक कुशलता आणि संघटनात्मक कौशल्यासाठी सुद्धा ओळखले जात होते. आम्ही त्यांचे आदर्श पूर्ण करणे आणि एक मजबूत भारत बनवण्यासाठी प्रतिबद्ध आहोत.

उच्च स्तरीय स्मारक समितीच्या सदस्यांमध्ये तज्ज्ञ, इतिहासकार, लेखक, नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या कुटुंबातील सदस्य आणि सोबतच आझाद हिंद फौज, आयएनएशी संबंधीत प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी होतील. ही समिती दिल्ली, कोलकाता आणि नेताजी आणि आझाद हिंद फौजशी संबंधीत अन्य ठिकाणांवर, जी भारतासह परदेशात सुद्धा आहेत, येथे उपक्रमांसाठी मार्गदर्शन करेल.

काही दिवसांपूर्वीच, भारत सरकारने नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा अनमोल वारसा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. लाल किल्ला, नवी दिल्लीत नेताजी यांच्यावर एक संग्रहालय स्थापन केले गेले आहे, ज्याचे उद्घाटन 23 जोनवारी 19 ला पंतप्रधानांनी केले होते. ऐतिहासिक व्हिक्टोरिया मेमोरियल भवनात कोलकातामध्ये एक स्थायी प्रदर्शन आणि नेताजी यांच्यावर एक लाइट अँड साऊंड शोची स्थापना करण्याची योजना बनवण्यात आली आहे.

2015 मध्ये, भारत सरकारने नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी संबंधित फाइल्स हटवणे आणि त्या जनतेसाठी सुलभ करण्याचा निर्णय घेतला. 4 डिसेंबर 2015 ला 33 फाइल्सचा पहिला लॉट डिक्लेयर करण्यात आला होता. लोकांची मोठ्या कालावधीपासून असलेली मागणी पूर्ण करण्यासाठी 23 जानेवारी 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींच्या संबंधित 100 फाइल्सच्या डिजिटल प्रति जारी केल्या होत्या.

2018 मध्ये अंदमान आणि निकोबार बेटाच्या आपल्या दौर्‍यात, नेताजी बोस यांनी तिरंगा फडकावल्याच्या घटनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्तच्या कार्यक्रमात मोदी सहभागी झाले होते. पंतप्रधानांनी अंदमान आणि निकोबारमध्ये 3 बेटांचे नाव बदलले. रॉस बेटाचे नाव बदलून नेताजी सुभास चंद्र बोस बेट ठेवले; शहीद दवे यांच्यानावाने नील बेट; आणि स्वराजद्वाप म्हणून हॅवलॉक बेटाला नाव दिले होते.

अभिषेक सावंत

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

3 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

3 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

3 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago