लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या पंधरा दिवसांपासून सत्तेच्या वाटपावरून खासदार शिवसेना संजय राऊतांची धावपळ सुरु होती. त्यामुळे आज अचानक छातीत वेदना होत असल्याने संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज त्यांची अॅंजीओग्राफी करण्यात येईल अशी माहिती त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी दिली.
दोन दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. पुढचे दोन दिवस संजय राऊत कुणालाही भेटणार नाहीत असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. संजय राऊत निवडणूक निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासून चर्चेत आहेत. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांना छातीत वेदना होत होत्या. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
संजय राऊतांकडे निकाल लागल्यापासून शिवसेनेच्या सर्व भूमिका मांडण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे दररोज संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडत होते. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना, माध्यमांच्या प्रतिनिधींना भेटत होते. त्यामुळे त्यांच्यावर बराच ताण होता. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांच्या भेटीसाठी शिवसेना नेत्यांनी रुग्णालयात गर्दी केली आहे.
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…