महाराष्ट्र

नाशिक मनपाचा असेल स्वत:चा वाहतूक सेल

नाशिक शहराचा विकास झपाट्याने होत असताना वाहनसंख्या दिवसेंदिवस वाढत असून वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्येने भयाण स्वरुप धारण केले आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी महापालिका पोलिस यंत्रणेप्रमाणे स्वत:चा वाहतूक सेल निर्माण करणार असून नुतन आकृतीबंधात या सेलसाठी कार्यकारी अभियंता व दोन उप अभियंते या नवीन पदांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई, पुणे महापालिकांमध्ये वाहतूक सेल असून नाशिक मनपातही तो कार्यरत झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी फोडणे व पार्किंगला शिस्त लावणे या समस्या निकाली लागतील.

मुंबई व पुणे पाठोपाठ नाशिक शहर वेगाने वाढत आहे. शहराची लोकसंख्या पंचवीस लाखांचा घरात पोहचली असून विकासबरोबर येथे चारचाकी, दुचाकींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. मुख्य शहरासह उपनगरांमध्येही वाहतूक कोंडीची भर पडत आहे. त्याच बरोबर पार्किंगला जागा नसल्याने शहरातील रस्तेच पार्किंग बनले आहेत. मुख्य बाजारपेठा असो की काॅलनी रस्ते वाहन पार्किंगसाठी वापरले जात आहे.

शासनाच्या नगरविकास विभागाने वाढते शहरिकरण पाहता महापालिकांनी पोलिस यंत्रणेप्रमाणे वाहतूक सेल निर्माण करावा असे आदेश दिले होते. त्याचा आधार घेत मुंबई, पुणे महापालिकांनी वाहतूक सेल हा स्वतंत्र विभाग निर्माण केला. त्यांच्या मार्फत शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे, पार्किंगसाठी जागा उपलब्ध करुन देणे, अपघात टाळण्यासाठी उपाययोजना, रस्ते वाहतूक सुरक्षा उपाय, अतिक्रमणमुक्त वाहतूक मार्ग यांसह विविध मुद्यांवर काम केले जाते.

हे ही वाचा

मनपा जागेतील होर्डिंग निविदेत कोट्यावधींचा घोटाळा

नाशिक सावाना’ च्या वतीने कार्यक्षम खासदार अन् आमदार पुरस्कार प्रदान

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघडीकडून हिरवा कंदील

नाशिक शहराचा वेगाने होणारा विस्तार व वाहतुकीची समस्या पाहता महापालिकेने वाहतूक सेल हा विभाग निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका लवकरच शासनाकडे आकृतीबंध अंतिम मंजुरीसाठी पाठवणार आहे. त्यात वाहतूक सेल विभागासाठी कार्यकारी अभियंत‍ा व दोन उप अभियंते हे पद समाविष्ट केले आहेत. हा विभाग कार्यन्वित झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी फोडणे, पार्किगची समस्या सोडवणे व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी उपाययोजना अंमलात आणणे सहज शक्य होईल. त्यासाठी पोलिस यंत्रणेवरील अवलंबित्व कमी होईल.

मुंबई, पुणे या शहरांत महापालिकांचा स्वत:चा वाहतूक सेल विभाग कार्यन्वित आहे. नाशिक शहरासाठिही महापालिका हा विभाग निर्माण करणार आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचा आकृतीबंधात समावेश करण्यात आला आहे.
प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त मनपा

टीम लय भारी

Recent Posts

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

49 mins ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

3 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

3 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

4 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

4 hours ago

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

7 hours ago