महाराष्ट्र

Navratri 2022 : खळबळजनक! नवरात्रीनिमित्त खरेदी केलेल्या उपवासाच्या पदार्थातून विषबाधा

राज्यात नवरात्रोत्सवाची सगळीकडे धुमधाम पाहायला मिळत आहे. संपुर्ण नऊ दिवसांचे उपवास, अनवाणी चालणे, गरबा, देवीची आरती अशा या भारलेल्या वातावरणात जल्लोषात हा उत्सव साजरा करण्यात येत आहे, परंतु दोन जिल्ह्यांमध्ये या सणाला गालबोल लागल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात नवरात्रीनिमित्त खरेदी केलेल्या उपवासाच्या पदार्थांमधून विषबाधा झाल्याचे पाहायला मिळत आहे. सदर नागरिकांना गावातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. नऊ दिवसांच्या उपवासाचा उत्साह अनेकांमध्ये कमालीचा पाहायला मिळतो परंतु अशापद्धतीचे काही प्रसंग घडले की संपुर्ण उत्साहावर विरजण पडल्यासारखे होते.

हाती आलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद आणि जालना अशा दोन जिल्ह्यांमध्ये नवरात्रीच्या ऐन उत्सवात विषबाधेची खळबळजनक घटना समोर आली आहे. औरंगाबाद येथील लासूर स्टेशन येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांनी भगर, भगरीचे पीठ खरेदी केले होते. दरम्यान या भगरीच्या पीठापासून पदार्थ बनवून सेवन केले असता 13 जणांना पोट दुखणे, चक्कर येणे असे त्रास सुरू झाले त्यामुळे त्यांना तात्काळ गावातील रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डाॅक्टरांनी त्यांना विषबाधा झाल्याचे सांगितले आहे.

औरंगाबाद प्रमाणेच जालना येथील परतुर तालुक्यात सुद्धा भगर आणि भगरीच्या पीठाचे सेवन केल्याने तब्बल चार गावांतील 24 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या नागरिकांना सुद्धा पोट दुखणे, चक्कर येणे असा त्रास अचानक जाणवू लागल्याने तात्काळ गावातीलच रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन जिल्ह्यांमध्ये एकाच पदार्थामधून झालेली ही विषबाधा अतिशय गंभीर असून असे भेसळयुक्त पदार्थ विक्रीवर चाप का बसत नाही म्हणून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा…

Women Singer Allegation : ‘स्वत:च्या सुरक्षारक्षकाने मला नग्नावस्थेत पाहिलेले’ गायिकेने केलाय धक्कादायक खुलासा

INDvsSA T20I : केरळमध्ये पोहोचताच भारतीय संघाला झाली संजू सॅमसनची आठवण! सूर्यकुमार अन् अश्विनने केले खास कृत्य

Eknath Shinde : शिंदेगटातील शिवसेनापक्षप्रमुख ‘एकनाथ शिंदे’च!

औरंगाबाद येथील विषबाधेवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी डाॅ. धानोरकर म्हणाले, लासूर स्टेशन येथील दुकानातून संबंधितांनी भगर खरेदी केल्याचे समजले. यासंदर्भात अन्न व औषधी प्रशासन विभागास तपासणी करण्याबाबत सूचना करण्यात येईल. तर अन्नबाधा झालेल्यांची प्रकृती स्थिर आहे, असे डाॅ. अभय धानोरकर यांनी सांगितले.

राज्यात भेसळयुक्त पदार्थ विक्रीवर अन्न व औषधी प्रशासन विभागाची कायम करडी नजर असते परंतु ऐन सणासुदीच्या वेळी विभागाकडून दुर्लक्ष झाल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले, परंतु या घटनांनंतर तरी आता त्यावर कारवाई करण्यात येईल का असा सवाल सुद्धा आता उपस्थित होत आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

7 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

8 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

9 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

9 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

9 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

11 hours ago