महाराष्ट्र

या वर्षीचा वाढदिवस साधेपणानेच करा- अजित पवार

टीम लय भारी

पुणेः माजी उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काॅंगेसचे नेते अजित पवार यांचा आज वाढदिवस होता. मात्र त्यांनी वाढदिवसाचा जल्लोष न करण्याचा निर्णय घेतला. अतिवृष्टी,पूरस्थितीमुळे राज्यात शंभरहून अधिक नागरिकांचा झालेला मृत्यू. पशुधनाची झालेली हानी, शेतजमीन व पिकांचे नुकसान, घरांची दुकानांची पडझड या सगळया पाश्र्वभूमीवर वाढदिवस न करण्याचा मी निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे.

लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सहकारी, कार्यकत्र्यांनी, हितचिंतकांनी कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करु नये. पुष्पगुच्छ पाठवू नये. होर्डिंग्ज लावू नये. वृत्तपत्र, टिव्ही, सामाज माध्यमांवर, जाहिराती प्रसारित करु नये. तो खर्च वाचवून त्या निधीतून पूरग्रस्त शेतकरी, विदयाथ्र्यांना मदत करावी असे आव्हान अजित पवार यांनी केले आहे.

हे सुध्दा वाचा:

द्रौपदी मुर्मूंची देशाच्या राष्ट्रपती पदी झालेली निवड हा ‘समस्त‘ स्त्रीशक्तीचा गौरव – अजित पवार

’या‘ कंपन्यांनी उचलले कामगार कपातीचे पाऊल

शिंदे-फडणवीस सरकारने ‘डिसले गुरुजीं’चा राजीनामा नामंजूर केला

रूपाली केळस्कर

Recent Posts

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

26 mins ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

3 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

4 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

4 hours ago

मधमाशी सौंदर्य खुलवते, आजार बरे करते

सदर व्हिडीओ मध्ये बिपीन जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ आपणास…

4 hours ago

मधमाशीकडून शिका बिझनेस मॅनेजमेंट

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

6 hours ago