महाराष्ट्र

ठाकरेंना दिलीप कुमारांच्या घरी जाण्यासाठी वेळ आहे, पण लोणकरच्या आईला भेटण्यासाठी नाही

टीम लय भारी

मुंबई :- बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची काल सकाळी 7:30 वाजता अखेर प्राण ज्योत मालवली.  त्यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर अनेक सेलेब्रिटी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्या घरी जाऊन दिलीप कुमार यांची पत्नी सायराबानो यांचे सांत्वन केले. दरम्यान दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी राजकीय नेतेही त्यांच्या घरी पोहोचले होते. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश होता. दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी यावरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे (Nitesh Rane has targeted Uddhav Thackeray over this).

दिलीप कुमार यांच्या निधनाची वार्ता समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या घरी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले. मात्र यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंना स्वप्नील लोणकरच्या घरी जाण्यासाठी वेळ नाही, मात्र तिथे जाण्यासाठी वेळ होता असे सांगत नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांचे सांत्वन करतानाचा फोटोही शेअर केला आहे (Nitesh Rane has also shared a photo of Uddhav Thackeray consoling Dilip Kumar’s wife Saira Bano).

दिलीपकुमार यांची वयाच्या 98 व्या वर्षी प्राणज्योत मालवली

उद्धव ठाकरेंनी दिलीपकुमारांना वाहिली श्रद्धांजली; रूपेरी नभांगणातील एक लखलखता तारा निखळला

नितेश राणे यांनी ट्विट करून म्हटलंय की, “महाराष्ट्र सरकारच्या अपयशामुळे ज्या स्वप्निल लोणकरने आत्महत्या केली. त्या स्वप्निलच्या आईची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे वेळ नव्हता. परंतु बाकीकडे जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. दुख:द आहे पण सत्य आहे अशा शब्दात नितेश राणेंनी खंत व्यक्त केली”.

दिलीप कुमार यांच्या निधनावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला. अजरामर भूमिका साकारणारे दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलीप कुमार यांना आदरांजली वाहिली. तसेच, दिलीप कुमार यांच्या घरी जाऊन त्यांचे अंत्यदर्शनही घेतले. त्यानंतर, सायरा बानो यांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दिलीप कुमारांच्या सांत्वनासाठी घरी गेले

शरद पवार भावुक; दिलीप कुमारांसोबतच्या आठवणींना दिला उजळा

Maharashtra CM Uddhav Thackrey arrives at Dilip Kumar’s residence, consoles Saira Banu

स्वप्नील लोणकर आत्महत्या

पुण्यात स्वप्निल लोणकर या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्निलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बाईंडिंगचा प्रिटिंग प्रेसचा छोटा व्यवसाय आहे. ते व त्यांची पत्नी असे दोघे हा व्यवसाय पाहतात. स्वप्निलने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त घेतली होती. स्वप्निलचे आईवडिल हे नेहमीप्रमाणे बुधवारी (३० जून) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडेचार वाजता घरी आली. तेव्हा स्वप्निलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने हा प्रकार आईवडिलांना कळविला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

स्वप्नील लोणाकर आणि त्यांची आई

स्वप्निलचे शिक्षण पूर्ण झाल्यापासून तो एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करीत होता. तो २०१९ च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे त्याची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्वपरीक्षा तो उत्तीर्ण झाला होता. वाढते वय आणि नोकरी करूनही कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या ‘सुसाईड नोट’ वरून आढळून येते.

Rasika Jadhav

Share
Published by
Rasika Jadhav

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

17 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

17 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

18 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

18 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

19 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

21 hours ago