महाराष्ट्र

Mission Begin Again : लॉकडाउन नाही, आता ‘मिशन बिगीन अगेन’ अर्थात पुनःश्च हरी ओम

टीम लय भारी

मुंबई : राज्य सरकारने (Maharashtra Govt ) नवीन नियमावली जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. त्यावेळी, लोकमान्य टिळकांचा दाखला देत पुनश्च हरी ओम.. म्हणजे पुन्हा नव्याने सुरुवात ‘मिशन बिगीन अगेन’ (Mission Begin Again) करत असून आता, प्रत्येक पाऊल जपून टाकायचे असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

राज्य सरकारने 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरी तीन टप्प्यांत नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे, लॉकडाऊनऐवजी आता मिशन बिगेन अगेन (Mission Begin Again) सुरु झाले आहे. पुनःश्च हरी ओम: हा नारा देत हळूहळू आपण सगळे काही सुरु करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो आहोत. करोनाशी आपला लढा सुरुच आहे. गर्दीला संमती दिलेली नाही, सभा समारंभ यांना परवानगी नाही. बाहेर फिरतानाही अंतर ठेवायचं आहे. या अंतरामुळेच आपण करोनाला एका अंतरावर ठेवणार आहोत. 3 जून पासून याची सुरुवात करतो आहे. 5 तारखेपासून रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकाने सुरुवातीला एका बाजूची दुकाने उघडायची आणि दुस-या दिवशी दुस-या बाजूची दुकाने उघडायची. गर्दी अजिबात करायची नाही. झुंबड उडाली तर बंद करण्याची वेळ यायला नको. महाराष्ट्रात शिस्तीचे असे उदाहरण घालून द्या की देशाने आपले उदाहरण समोर ठेवले पाहिजे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

पावसाळा येतो आहे. पाऊस पडला की शेवाळ साठते. त्या शेवाळावरुन आपला पाय घसरु नये म्हणून काळजी घेतो. प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागणार आहे. गेल्या आठवड्यात मी संपूर्ण यंत्रणेची बैठक घेतली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती. करोनासोबत जगायला शिका हे आपण सगळ्यांकडून ऐकतो आहोत. ते जगायचे म्हणजे काय? तर मास्क लावणे हे अपरिहार्य आहे. तसेच शिस्त ही प्रत्येकाने पाळायचीच आहे. बाहेर जाऊन आल्यानंतर हँडवॉशने हात धुणे, सॅनेटायझर वापरणे या सगळ्या गोष्टी वापरा.

८ जूनपासून आपण आपली कार्यालये १० टक्के उपस्थितीने सुरु करतो आहोत. काय काय परिणाम होईल त्याकडे लक्ष असणार आहे, असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. चाचण्यांची संख्या वाढवणे हेदेखील महत्त्वाचे आहे. टेस्टसाठी जी किंमत आहे ती आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो आहोत असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळली तर तातडीने टेस्ट करा. आपली आणि आपल्या घरातल्यांची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

अभिषेक सावंत

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 mins ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

39 mins ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

1 hour ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

6 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago