उत्तर महाराष्ट्र

विविध खोदकामांमुळे आठवड्यात ११५ पथदीप बंद

शहरात विविध कामांमुळे सुरू असलेल्या खोदकामांमुळे पथदीप (streetlights) बंद पडल्याबाबतच्या आठवडाभरात तब्बल ११५ तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या असून त्यातील १०६ ठिकाणी कामे पूर्ण करण्यात आली असून सहा ठिकाणी कामे पेंडिंग आहेत. शहरात एमजीएनएलसह सिग्नलही अद्ययावत करण्यात येत असल्याने ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. वेगवेगळ्या तक्रारींचा यात समावेश आहे. यात एमएसईबीचा पुरवठा अनेक ठिकाणी येत नव्हता, शिवाय काही ठिकाणी बिल्डींगची कामे सुरू असल्याने जेसीबीकडून अंडरग्राऊंड केबल तुटल्या आहेत. काही ठिकाणी गॅस पाईपलाईनचे काम सुरू असतांना केबल तुटल्या आहेत. काही ठिकाणी नवीन जोडणीबाबतचेही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.(115 streetlights shut down during week due to various drilling )

तसेच काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असल्याने पोल काढण्यात आले आहे, त्यामुळे हे काम पूर्ण होईपर्यंत ज्या तक्रारींबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा प्रलंबित आहे, त्यांच्याबाबत नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. जेथे जेथे कामे प्रलंबित ती लवकरात लवकर सोडविण्यात येतील असे यांत्रिकी विभागाच्यावतीने सांगण्यात आले. महापालिकेकडून दरवर्षी नवीन रस्ते तयार केले जातात. हे रस्ते तयार झाल्यानंतर विविध केबल्स, ड्रेनेज, पिण्याची पाईप लाईन आदी कामांसाठी रस्त्यांचे खोदकाम केले जाते. या खोदण्यात आलेल्या रस्त्यांमुळे या वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी लिमिटेड व भारत संचार निगमकडून मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. गॅस कंपनीने तर जवळपास २०५ किलोमीटरचे खोदकाम केले आहे. रस्त्याची खोदाई करून त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदकाम झालेली जागा पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. यामुळे आता खोदकाम करण्यात आलेली जागा पूर्ववत केली की नाही, याची तपासणी बांधकाम विभागाकडून करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रस्त्याची खोदाई करून त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदकाम झालेली जागा पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. यामुळे आता खोदकाम करण्यात आलेली जागा पूर्ववत केली की नाही, याची तपासणी बांधकाम विभागाकडून करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

अशा आल्या तक्रारी
विभाग तक्रारी

नाशिक पूर्व १९
नाशिकरोड २६

नाशिक पश्चिम १३
सिडको १४

पंचवटी ३३
सातपूर १०

एकूण ११५

महापालिकेच्या पोर्टलवर विद्युत विभागाशी संबंधित सर्व तक्रारी तातडीने सोडविल्या जातात. कोणाच्या काही तक्रारी असल्यास ऑनलाईन पोर्टलवर कराव्यात, त्याबाबत तत्काळ कामे केले जातील.
-अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी), मनपा

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

14 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

14 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

15 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

15 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

15 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

18 hours ago