उत्तर महाराष्ट्र

थकबाकीदारांचे 19 दिवसांत 249 नळजोडण्या खंडित मनपा पाणीपुरवठा व कर विभागाची संयुक्त मोहीम

नाशिक शहरात सुमारे दोन लाख पाण्याचे नळ धारक आहे. त्याच काही घरगुतीसह व्यवसायीक वापराचे देखील नळ जोळणी आहे. मात्र नाशिक मनपाची पाणीपट्टीच्या पोटी तब्बल सुमारे 95 कोटी रुपयांची थकबाकी झाल्याने मार्च एन्डच्या अनुशंगाने मनपा कर व पाणी पुरवठा विभागाने सक्तीची वसुली मोहीम हाती घेतली असून 50 हजार रुपयांच्यावर असलेल्या थकबाकीदरांचे थेट नळ कनेक्शन तोडण्यात येत आहे.22 फेब्रुवारी 2024 पासून मनपाने नळ तोड मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी 15 स्वतंत्र पथके निर्माण करुन प्रत्येक पथकात एका अधिकार्‍यासह एकूण चार जणांचा समावेश आहे. विषेश म्हणजे एक प्लंबर देखील सोबत आहे.

या विशेष मोहीमेत शहरातील 44 हजार 385 थकबाकीदारांचे नळकनेक्शन्स तपासण्यात येणार आहेत. संयुक्त मोहिमेअंतर्गत गेल्या 19 दिवसांत 249 नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. नाशिक शहरात एकूण दोन लाख सात हजार इतके नळजोडणी मालमत्ताधारक आहेत. यापैकी 44 हजार 385 नळ जोडणीधारक थकबाकीदार असून, त्यांच्याकडे 95 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. मनपाच्या कर विभागाकडून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घरपट्टीची जोरदार वसुली सुरू असली तरी पाणीपट्टी वसूल करताना कर विभाग आणि पाणीपुरवठा विभागाला मात्र यश येऊ शकलेले नाही. त्यामुळेच या दोन्ही विभागांनी आता संयुक्त मोहीम हाती घेत थकबाकीदारांची नळजोडणी खंडित करण्याची कारवाई हाती घेतली आहे. थकबाकी मालमत्ताधारकांना वारंवार नोटिसा बजावूनही वसुली होत नसल्यामुळे नळजोडण्या खंडित केल्या जात असून, मागील 19 दिवसांत 249 नळजोडण्या खंडित केल्या आहेत. नवीन नाशिक विभागामध्ये सर्वाधिक 73 नळजोडण्या खंडित करण्यात आल्या असून, त्याखालोखाल सातपूर विभागात 57, नाशिकरोडमध्ये 56, पंचवटीत 54, नाशिक पूर्वमध्ये पाच, तर पश्चिम विभागामध्ये चार जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.
पाणीपट्टीची सुमारे 95 कोटींहून अधिक थकबाकी आहे. थकीत रक्कम वसूल करण्याकरिता संयुक्त मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत एकूण 249 नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. ही कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी थकीत पाणीपट्टी अदा करून कारवाई टाळावी.
– संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग

टीम लय भारी

Recent Posts

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

2 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

2 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

2 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

2 hours ago

कुटुंबीयांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…

3 hours ago

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

15 hours ago