ईव्हीएम मशिन परिसरात स्ट्राँगरूमच्या स्वच्छतेसाठी 44 कर्मचाऱ्यांचे विशेष पथक

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचे सोमवारी (ता. २०) मतदान झाले. मतदान झाल्यावर सर्व ईव्हीएम यंत्रे अंबड येथील सेंट्रल वेअर हाउसमध्ये ठेवण्यात आली. मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर ईव्हीएम मशिन परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी महापालिकेला सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे.लोकसभेच्या दिंडोरी व नाशिक लोकसभेचे मतदान संपल्यावर ईव्हीएम यंत्रे अंबड येथील सेंट्रल वेअर हाउसमधील स्ट्राँगरूममध्ये (strongroom) ठेवण्यात आली आहेत. या स्ट्राँगरूमच्या (strongroom) स्वच्छतेसाठी महापालिकेतर्फे ४४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.(A special team of 44 personnel to clean the strongroom in the EVM machine area )

कचरा संकलनासाठी दोन स्वतंत्र घंटागाड्या व २० तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी दिली.

सर्व ईव्हीएम यंत्रे अंबड येथील सेंट्रल वेअर हाउसमध्ये ठेवण्यात आली. मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर ईव्हीएम मशिन परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी महापालिकेला सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. विभागीय स्वच्छता निरीक्षक, दोन स्वच्छता निरीक्षक, दोन मुकादम व ३९ सफाई कर्मचारी येथे नियुक्त करण्यात आले. कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून विशेष ओळखपत्रे तयार करण्यात आली आहेत स्ट्राँगरूममध्ये कार्यरत असलेले कर्मचारी तसेच पोलिसांसाठी शौचालयांची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, शहरातील मतदान केंद्रांची महापालिकेतर्फे स्वच्छता करण्यात आली. पूर्व विभागातील ३७ मतदान केंद्रांसाठी १११ सफाई कर्मचारी, पश्चिम विभागातील २९ मतदान केंद्रांसाठी ८७. सातपूर विभागातील १८ मतदान केंद्रांसाठी ३६, सिडको विभागातील ४३ मतदान केंद्रांसाठी ८६, नाशिक रोड विभागातील २२ मतदान केंद्रांसाठी ४६, तर पंचवटी विभागातील ३२ मतदान केंद्रांसाठी १२० सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

टीम लय भारी

Recent Posts

सुजय विखेंचा रडीचा डाव !

डॉ. सुजय विखे पाटील (Dr.Sujay Vikhe Patil) यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय. पण पराभव स्विकारण्याची…

12 hours ago

महात्मा गांधी मु्स्लिमधार्जिणे होते का ? ( ज्येष्ठ पत्रकार रफिक मुल्ला यांचा लेख)

महात्मा गांधींजींशी संबंधित प्रसंग १ - हरिद्वारला कुंभमेळा भरला होता. महात्मा गांधी कुंभमेळ्याला ट्रेनने निघाले…

13 hours ago

कामगारांच्या आराेग्यासाठी इएसआयसीला महिन्याला १३ काेटी देऊनही कामगारांचे आराेग्य मात्र अधांतरीच

कामगारांच्या आराेग्यासाठी (workers health) उद्योजकवर्गाकडून इएसआयसीला महिन्याला १३ काेटी अर्थातच वर्षाला १५६ काेटी रूपये देऊनही…

1 week ago

रात्री एक वाजेपर्यत मित्रांसोबत पार्टी करणं महिला डॉक्टरच्या जीवावर बेतलं

मेडिकल कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून पडून महिला डॉक्टरचा मृत्यू (doctor's life) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…

1 week ago

सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा

सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करुन लाखोंचा घोटाळा (duped)…

1 week ago

नाशिक येथे स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा

विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात…

1 week ago