उत्तर महाराष्ट्र

विरोधकांच्या चुकीच्या मुद्द्यांना प्रभावीपणे उत्तर द्यावे:डॉ.भारती पवार

मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताची गगनाला गवसणारी प्रगती झाली असून आज जगभरात भारताचे मान उंचावली आहे परंतु सामाजिक प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या विरोधकांच्या चुकीच्या मुद्द्यांना भाजप तसेच महायुतीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी प्रभावीपणे उत्तर द्यावे व पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकारच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेपुढे सादर करावा असे आवाहन नामदार भारती पवार ( Dr Bharati Pawar) यांनी केले आहे ,त्या उद्या दिनांक २ मे २०२४ रोजी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नामांकन भरनार असून त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वसंत स्मृती येथे बोलत होत्या.( Answer opposition’s wrong points effectively: Dr Bharati Pawar)

यावेळी व्यासपीठावर नामदार भारतीताई पवार, दिंडोरी भाजप लोकसभा निवडणूक प्रमुख बाळासाहेब सानप,शहराध्यक्ष प्रशांत जाधव नाशिक जिल्हा दक्षिण ग्रामीण चे अध्यक्ष सुनील बच्छाव, आमदार सीमाताई हिरे,आमदार एडवोकेट राहुल ढिकले, प्रदेश कार्यालय प्रभारी व उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, भाजप नाशिक जिल्हा प्रभारी व प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय साने,सरचिटणीस सुनील केदार नाना शिलेदार हिमगौरी अडके एडवोकेट श्याम बडोदे गणेश कांबळे, प्रशांत भदाणे, माजी महापौर रंजना भाणसी, माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

त्यापुढे म्हणाल्या की खुल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या कालावधीत प्रचंड विकास कामे झालेले आहेत परंतु या विकास कामांचे श्रेय घेण्यास आपण कमी पडत आहोत. सामाजिक प्रसार माध्यमाद्वारे तसेच गावागावात कार्यकर्त्यांची व जनतेशी सुसंवाद साधून मोदी साहेबांच्या विकास कामांची माहिती द्यावी व विरोधकांना योग्य ते उत्तर द्यावे असे त्या म्हणाल्या. विरोधक अत्यंत खालच्या पातळीला जाऊन विचार करीत आहेत परंतु कार्यकर्त्यांनी आपला संयम ठेवून विरोधकांना सोबत उत्तर द्यावे असे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकले असून ते अत्यंत खालच्या पातळीला जाऊन प्रचार करीत आहेत परंतु संपूर्ण भारतातील जनतेच्या मोदी साहेब त्यांच्या विकासाच्या माध्यमातून राज्य करीत आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी फक्त आता महायुतीच्या प्रचंड मताधिकांनी उमेदवारांना विजयी करावे असे त्या म्हणाल्या.

दिंडोरी लोकसभेचे भाजपाचे उमेदवार नामदार भारतीताई पवार व नाशिक लोकसभेचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांचा उमेदवारी अर्ज दिनांक २ मे २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात येणार आहे तरी रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजर राहावे असे आव्हान मा.आमदार दिंडोरी लोकसभेचे निवडणूक प्रमुख बाळासाहेब सानप यांनी केले आहे.

प्रदेश मुख्यालय प्रभारी व उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी कार्यकर्त्यांना प्रत्येक बुथ वर ३७० प्लस मतांची वाढ झाली पाहिजे मग आपल्याला आपकी बार ४०० पार काहीच अवघड नसल्याचे ते म्हणाले. परंतु यासाठी लोकसभा क्षेत्रातील भाजपचे प्रदेश पदाधिकारी आमदार तसेच लोकप्रतिनिधी विविध प्रकारचे पदाधिकारी यांनी या निवडणुकांमध्ये स्वतःला झोकुन घ्यावे व भूतो न भविष्यती असा प्रचंड लीड आपल्या उमेदवारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे व त्याच्या चार जूनला विजय उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज राहावे असे ते म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी सुरुवातीला दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारतीताई पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व अध्यक्ष भाषणातून निवडणूक संदर्भातील विविध कार्यक्रमांचा तपशील सादर केला यावेळी आमदार सीमाता अहिरे आमदार राहुल ढिकले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले

या बैठकीस सूत्रसंचालन सुनील केदार यांनी केले तर आभार प्रदर्शन नाना शिलेदार यांनी केले
या बैठकीस नाशिक महानगरातील मा.नगरसेवक मंडळाचे अध्यक्ष अनुक्रमे भगवान काकड अविनाश पाटील रवी पाटील वसंत उशीर ज्ञानेश्वर काकड सुनील देसाई चंद्रशेखर पंचाक्षरी भास्कर घोडेकर शांताराम घंटे, युवा मोर्चा अध्यक्ष सागर शेलार महिला मोर्चा अध्यक्ष सोनाली ठाकरे, अमित घुगे अजिंक्य साने,सुनील फरांदे आदीसह आघाड्या व प्रकोष्ठ यांचे पदाधिकारी हजर होते

भाजप कार्यकर्त पदाधिकारी यांचा मेळावा चालू असताना खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर त्यांनी लगेचच भारतीय जनता पार्टी वसंतस्मृती कार्यालयात भेट दिली. पालकमंत्री दादा भुसे यांचे समवेत अजय बोरस्ते व शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते भाजप कार्यालयात आले व जोरदार फटाके वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले व कार्यकर्त्यांना पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी कार्यक्रमात आमदार भारतीताई पवार यांचा सत्कार पालकमंत्री दादा भुसे यांनी केला तर खासदार हेमंत गोडसे यांचा सत्कार प्रशांत जाधव यांनी केला यावेळी पालकमंत्री दादा भुसे व खासदार हेमंत गोडसे यांनी आनंद व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले व महायुतीचे दोन्ही उमेदवार महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करतील व प्रचंड मतांनी निवडून आणतील असा आत्मविश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले

टीम लय भारी

Recent Posts

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

8 hours ago

प्लॅस्टिक की लाकडी, केसांच्या आरोग्यासाठी कोणता कंगवा चांगला?

आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि  शॅम्पूचा वापर करतो.…

9 hours ago

3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…

10 hours ago

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…

11 hours ago

पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक करण्यासाठी रोज करा ‘हे’ व्यायाम

आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…

12 hours ago

फ्लटर किक्स व्यायामामुळे पायाचे स्नायू होतात मजबूत, जाणून घ्या

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…

13 hours ago