उत्तर महाराष्ट्र

आशा व गटप्रवर्तक पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ५२ दिवस संप केल्यानंतरही कोणतीही मानधन वाढ जाहीर केली नसल्याने आशा व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट व मानधन वाढीबाबत कोणताही निर्णय न झाल्याने कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये आशा व गटप्रवर्तकांनी २२ दिवस संप केल्यानंतर आशांना ७००० रुपये व गटप्रवर्तकांना १०,००० रुपये मानधन वाढ देण्याचे व एक महिन्यात शासन निर्णय (GR)प्रसिद्ध करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र दोन महिने होऊनही शासन निर्णय प्रसिद्ध न केल्याने १२ जानेवारीपासून आशा व गटप्रवर्तक संपावर आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आशा व गटप्रवर्तकांच्या मानधन वाढीबाबत निर्णय अपेक्षित होता.

मात्र तो न झाल्यामुळे ७७ हजार आशा व गटप्रवर्तका मध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ५२ दिवस संप केल्यानंतरही कोणतीही मानधन वाढ जाहीर केली नाही.२.५ लाख अंगणवाडी कर्मचारी सरकारवर संतापले आहे. मोदी सरकार व शिंदे सरकार हे कर्मचारी विरोधी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे सर्व कामगार कर्मचारी संघटना एकत्र येऊन आंदोलन तीव्र करण्याच्या मनस्थितीत असल्याचे सिटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल.कराड यांनी सांगितले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यात सुमारे ७५ हजार आशा व साडेतीन हजारापेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी दि. १८/१०/२०२३ ते दि.०१/११/२०२३ या कालावधीत त्यांच्या न्याय व रास्त मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता. या संपाच्या पार्श्वभुमीवर संप काळात मा. आरोग्य मंत्री यांनी दि. ०१/११/२०२३ रोजी आरोग्य भवन, मुंबई येथे संपाच्या वाटाघाटीसाठी कृति त्तमितीसोबत बैठक घेतली होती. सदर बैठकीत मा. आरोग्य मंत्री यांनी खालील निर्णय घेवुन घोषणा केली होती.
१) आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट रु. २००० दिवाळीपूर्वी देण्यात येणार, २) आशा स्वंयसेविकांच्या मोबदल्यात रु.७००० ची वाढ, ३) गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रु.६२०० ची वाढ आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी संप काळातील कामकाज पूर्ण केल्यास त्यांना संपकाळातील मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन मा. आरोग्य मंत्री यांनी दि.०१/११/२०२३ रोजी आरोग्य भवन, मुंबई येथे घेतलेल्या बैठकीत कृति समितीला दिले होते. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी संपकाळातील कामे पूर्ण केली आहेत. परंतु त्यांचा मोबदला कपात करण्यात आला आहे. तरी कपात केलेला मोबदला आशा स्वंयसेविका व गटप्रतर्वकांना अदा करण्याचे आदेश काढण्यात यावेत.

गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ न केल्यामुळे संप पुढे लांबला. गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ व्हावी याकरीता मा. नरहरी झिरवळ, उपाध्यक्ष विधानसभा, म.रा. यांनी मा. मुख्यमंत्र्याकडे गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ करण्यासाठी शिफारस केली. दि.०९/११/ २०२३ रोजी मा. अप्पर मुख्य सचिवासोबत कृति समितीची बैठक मा. खा. हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मा. मुख्यमंत्र्यानी अप्पर मुख्य सचिव मा. मिलिंद म्हैसेकर यांना मोबाईल फोनवरुन गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात ६२०० वरुन १०००० रुपयांची वाढ करण्याचे आदेशीत केले. त्यानंतर कृति समितीने संप स्थगीत केल्याचे जाहीर केल्यामुळे दि. १०/११/२०२३ पासुन राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी दैनंदिन कामकाजास सुरुवात केली. तसेच आ. भा. कार्ड काढणे, गोल्डन कार्ड काढणे, पीएमएमव्हीवाय चे फॉर्म ऑनलाईन भरणे अशी ऑनलाईन करण्याचे कामे आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक दिवसरात्र मेहनत घेवुन करत आहेत. संप स्थगीत होवुन दीड महिना होवुन गेला परंतु अदयाप शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नाही. मा. आरोग्य मंत्र्यांना कृति समितीच्यावतीने नागपुरच्या हिवाळी अधिकवेशनात दि. १८/१२/२०२३ रोजी प्रचंड मोर्चा काढून शासन निर्णय त्वरीत काढण्याची विनंती केली परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. परीणामी राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मनामध्ये शासनाप्रति तिव्र नाराजी निर्माण होत चालली आहे. त्यामुळे दि. २९/१२/२०२३ पासून ऑनलाईनच्या सर्व कामकाजावर राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक बहिष्कार टाकत आहेत.
मा. आरोग्य मंत्री व मा. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्याबाबतीत खालील प्रमाणे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत.

१. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट रु.२००० दिवाळीपूर्वी देण्यात येणार.
२.आशा स्वंयसेवकांच्या मोबदल्यात रु.७००० ची वाढ
३.गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रु.१०००० ची वाढ
४. गट प्रवर्तक ना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या.
५. आशा गट प्रवर्तक चे थकीत मोबदला द्या.
६. आशा गट प्रवर्तक संघटना राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले यांना पंतप्रधान दौरा नाशिक वेळीं पंचवटी पोलिस स्टेशन निरीक्षक तत्कालीन अनिल शिंदे यांनी अमानवीय वागणूक दिली. व पोलिस कोठडीत ठेवले. याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा.
वरील मागण्या करीत आहोत.
मंजुर केलेल्या मागण्यांचे शासन निर्णय काढला नाही . त्यामुळें दि.१२/०१/२०२४ पासुन राज्यातील सर्व ७५ हजार आशा व ४हजार गटप्रवर्तक राज्यव्यापी बेमुदत संपावर आहेत. त्वरित मंत्री मंडळ बैठकीत निर्णय घ्यावा. या साठी धरणे आंदोलन आयटक वतीने करीत आहोत. व फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्हा परिषद वर ११वा. जमून जेल भरो आंदोलन छेडण्यात येणार आहे. व तीव्र आंदोलन पुढें करू असा इशारा देत आहोत.

आपले
कॉ.राजू देसले
महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते गटप्रवर्तक संघटना
(राज्याध्यक्ष)
7066669894
: मयाताई घोलप
सुवर्णा मेतकर
अर्चना गडख,
ज्योती खरे
कविता गवई
वैशाली देशमुख
अरुणा आव्हाड
सुश्मा वटारे
सायली महाले
प्राजक्ता कापडणे, वैशाली कवडे, सविता अहीरे, अलका भोये, सुनिता कुलकर्णी, लक्ष्मी पगारे,

टीम लय भारी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

3 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

5 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

7 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

9 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

10 hours ago