उत्तर महाराष्ट्र

मनपाकडून पंचवटीत एकाच दिवशी गाळे धारकांकडून तब्बल नऊ लाख वसुली

नाशिक मनपाच्या पंचवटीतील मालकीचे व्यावसायिक गाळे-भाडे धडक वसुली मोहीमेत आज शुक्रवार दि.१ मार्च २०२४ रोजी मनपाचे आयुक्त डॉ अशोक करंजकर यांच्या आदेशानुसार उपायुक्त श्रीकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त मयुर पाटील व पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिचंद्र यांच्या उपस्थितीत एकुण ९,००,०० (नऊ लाख) रुपये गाळेधारक ( BMC collects Rs 9 lakh Cart owners ) यांच्याकडून वसूल करण्यात आले. यावेळी मनपा गाळे वसुली विभागाचे अधिक्षक मंगेश वाघ,सहा.अधिक्षक भुषण देशमुख,राजेश सोनवणे,दिपक मिंधे,प्रकाश उखाडे,राहुल बोटे,संजय बोरसे,ईश्वर शेंडके,रवि शिंदे,कैलास गायकवाड यांनी बेधडकपणे वसुलीसाठी विशेष कामकाज केले.( BMC collects Rs 9 lakh from cart owners in Panchavati on a single day )

पंचवटी भागात मनपा वाहन भांडार,दिंडोरीरोड,संजयनगर, हिरावाडी-लाटेनगर,ट्रक टर्मिनस, पंचवटी कारंजा आदी प्रमुख भागातील मनपा मालकीचे गाळे भाडेपोटी घेऊन व्यावसायिक धारकांकडून गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात भाडे थकलेले असल्याने मनपाकडून यंदाही मार्च महिना अखेर पर्यंत भाडे वसुलीसाठी विशेष धडक वसुली मोहीम हाती घेतली.मनपाकडून पंचवटी विभागात एकाच दिवशी गाळे धारकांकडून तब्बल नऊ लाख वसुली आहे.यावेळी थकबाकीदार गाळे धारकांकडून लवकरात-लवकर गाळेभाडे भरले नाही तर तात्काळ गाळे सीलबंद कारवाई करण्यात येणार आहे.अशी माहिती सहाय्यक आयुक्त मयुर पाटील यांनी दिली. दरम्यान,मनपाच्या पंचवटीतील घरपट्टी-पाणी पट्टी विभागाकडून थकबाकी रक्कम वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.पंचवटी भागात मनपाचे उपायुक्त श्रीकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त मयुर पाटील व पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिचंद्र यांच्या उपस्थितीत घरपट्टी-पाणीपट्टी थकबाकीदार यांच्या वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम सुरू झाली आहे.आजपर्यंत वारंवार मागणी करूनही थकबाकी रक्कम जमा न करणाऱ्या थकबाकीदार घरपट्टी-पाणीपट्टी बील धारकांचे नळ कनेक्शन सीलबंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे नळ कनेक्शन सीलबंद कारवाई टाळण्यासाठी व भीतीपोटी घरपट्टी-पाणीपट्टी नळ कनेक्शन धारकांकडून तत्काळ पाणीपट्टी थकबाकीचे पूर्ण बील लगेचच भरण्यात येत आहे.

शुक्रवार दिनांक- १ मार्च २०२४ रोजी पंचवटी भा गात विशेष वसुली मोहीमेत घरपट्टी वसुलीत एकुण – ४,००.००० (चार लाख) रुपये तर पाणीपट्टी एकुण- ६,००,००० (सहा लाख रुपये) वसुली झाली आहे.तर पंचवटी विभागात मा गील वर्षी एकुण- २९.३१ कोटी रुपये वसुली तर यंदा आजपर्यंत एकुण- ३३.३२ कोटी रुपये वसुली झाली आहे. यानुसार आजपर्यंतच्या घरपट्टी-पाणीपट्टी वसुली त यंदा एकुण-चार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.यासाठी पंचवटी विभागीय घरपट्टी-पाणीपट्टी वसुली निरिक्षक नारायण लांडे,विनायक बोरसे,विकास देवरे,उदय खैरनार,रविकांत मोरे,वसंत चव्हाण,चांद शेख,रविंद्र कलगुंडे,संतोष खांदवे आदींसहदीं घरपट्टी-पाणीपट्टी विभागातील सर्व कर्मचारी यांच्याकडून चोखपणे कामकाज केले जात आहे.यापुढेही दररोज मनपा मालकीचे गाळे भाडे वसुली बरोबरच प्रामुख्याने घरपट्टी-पाणीपट्टी बील वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम चालूआहे. नागरीकांनी त्वरित व वेळेत मनपा मालकीचे गाळे भाडे तसेच थकबाकी असलेल्या मिळकत धारकांनी आपल्या घराची घरपट्टी-पाणीपट्टी बील भरून होणारी नळ कनक्शन तोडणे व मिळकत जप्ती सारखी कठोर दंडात्मक कारवाई टाळावी.व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ अशोक करंजकर,उपायुक्त (कर) श्रीकांत पवार,सहायक आयुक्त मयुर पाटील व पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांनी केले आहे. मनपा गाळे थकबाकी वसुली व घरपट्टी-पाणीपट्टी वसुली मोहीम यापुढेही चालू राहील.या विशेषवसुली मोहीम प्रसंगी चोखपणे पोलीस बंदोबस्त असून अतिक्रमण विभागाचे उपायुक्त श्री.नेर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी पथक सहभागी आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

30 mins ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

44 mins ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

1 hour ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

2 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

4 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

4 hours ago