उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भोरे कलामंदिरचे लोकार्पण

नाशिक महानगरपालिकेतर्फे 25 कोटी रूपये निधी खर्चून हिरावाडी येथे साकारलेल्या स्व.सदाशिव गंगाराव भोरे कलामंदिराचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी नगरसेविका प्रियंका माने, पूनम मोगरे, रूची कुंभारकर, मच्छिंद्र सानप यांच्यासह अधिकारी व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फित कापून व कोनशिला अनावरण करून कलामंदिराचे लोकार्पण करण्यात आले.

हिरावाडी परिसरात महापालिकेच्या सहा एकर जागेत या कलामंदिराचे 2900 चौरस मीटरचे बांधकाम करण्यात आले आहे. या नाट्यगृहात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नाट्यगृहाच्या पश्चिम बाजूस वाहनतळाची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंना प्रसाधनगृहांची व्यवस्था, कलाकरांना तालीम करण्यासाठी दोन्ही मजल्यांवर स्वतंत्र दोन हॉल, भव्य रंगमंच व सुसज्ज मेकअप रूमही आहे. नाट्यगृहात भव्य प्रकाशयोजना, ध्वनीयोजना, स्वयंचलित सरकते पडदे यासह बाल्कनीत 150 आणि खाली 500 अशा एकूण 650 आरामदायी खुर्च्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. यासह अत्याधुनिक सीसीटिव्ही यंत्रणा व सुरक्षिततेच्या दृष्टीन अग्नीशमन यंत्रणाही येथे कार्यान्वित करण्यात आली आहे.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago