उत्तर महाराष्ट्र

द्वादश ज्योतिर्लिंग अध्यात्मिक मेळावा हा भक्तांसाठी पर्वणीच:डॉ शोभा बच्छाव

बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन करणे हे प्रत्येक भक्ताच्या जीवनातील एक अप्रतिम क्षण आहे. मात्र प्रत्येक जण ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जाऊ शकत नाही परंतु ब्रह्माकुमारी संस्थेने या ठिकाणी लावलेले द्वादश ज्योतिर्लिंग अध्यात्मिक मेळावा हा भक्तांसाठी पर्वणीच आहे. एकाच छताखाली सर्व ज्योतिर्लिंग चे दर्शन प्राप्त करून भक्तगण नक्कीच पुण्य प्राप्त करतील भक्तांच्या सोयीसाठी आयोजित केलेले हे एक महापुण्य कार्य ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे करण्यात आले आहे असे प्रतिपादन माजी आरोग्य मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांनी केले.
ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे महाशिवरात्रीनिमित्त गोदावरी तीरावर दुतोंड्या मारुती समोर अहिल्या व्यायाम शाळा पटांगण येथे द्वादश ज्योतिर्लिंग आध्यात्मिक मेळाव्याचे आयोजन दिनांक 7 मार्च ते 10 मार्चपर्यंत करण्यात आले आहे.

या द्वादश ज्योतिर्लिंग मिळण्याचा उद्घाटन सोहळा दिनांक 7 मार्च रोजी संपन्न झाला. याप्रसंगी उद्घाटक म्हणून डॉक्टर बच्छाव बोलत होत्या. अध्यक्ष स्थानावर राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी तर प्रमुख पाहुणे म्हणून
पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ला सामाजिक कार्यकर्ते सतनाम राजपूतमामा राजवाडे, माजी नगरसेवक सुरेश खेताडे माजी नगरसेविका पुनम सोनवणे, वत्सला ताई खैरे, पत्रकार भागवत उदावंत, आदी मान्यवर उपस्थित होते

अध्यक्ष स्थानावरून नाशिक जिल्हा मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी यांनी महाशिवरात्रीचे महत्त्व स्पष्ट केले. परमात्मा शिव हे निराकार असून परमात्म्याला शिव असे नाव सुद्धा आहे व रूपही आहे. मात्र अनेक जण त्यांना नाम रूप पेक्षा वेगळा असे समजून पूजनाचा प्रयत्न करतात. बरेच जण परमात्म्याला मानता ही परंतु जाणत नाही. त्यामुळे परमात्म्याचा सत्य परिचय प्राप्त करून घेणे प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. परमात्म्याचा हा परिचय ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या साप्ताहिक कोर्स मधून मिळतो. निशुल्क देण्यात या साप्ताहिक कोर्समध्ये स्व अनुभूती परमात्मा अनुभूती व विश्व अनुभूती असे ज्ञान मिळते. परमात्म्याच्या सत्य स्वरूपाला समजून आपण त्याचे ध्यान केले तर नक्कीच आपले दुःख निवारण होऊन सुख संपन्नता येते असे प्रतिपादन दीदींजी यांनी याप्रसंगी केले.
पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश जी शुक्ला यांनी सांगितले की ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्यालयात जाण्याचा मला योग आला. महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांच्यासारख्या उच्चपदस्थ महिला त्या ठिकाणी साधक म्हणून वावरतात यावरून संस्थेची उंच प्रतिमा दिसून येते. ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये आल्यानंतर सुख शांती लाभते असे प्रतिपादन शुक्ला यांनी याप्रसंगी केले.
कार्यक्रमात सर्व मान्यवर महिलांना ब्रह्माकुमारीज नारी शक्ती अवॉर्ड 2024 देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानाच्या मानकरी मध्ये प्रामुख्याने शिवानी पांडे, सविता गायकर, कल्पना निकम, एडवोकेट एकता विनायक खैरे, साधना पाटील, छाया भंडारी, आशा पारख, लता लोढा, संगीत खैयनार, कुंदा बच्छाव, सविता चतुर, स्वाती जाधव, आदी कर्तुत्ववान महिलांना ब्रह्माकुमारी संस्थेचा नारीशक्ती अवॉर्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी तर स्वागत ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी यांनी केले.
पाहुण्यांनी द्वादश ज्योतिर्लिंगाची अवलोकन केले व एका छताखाली बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन प्राप्त करून धन्यता मांनली. द्वादश ज्योतिर्लिंगाचे रात्रीपर्यंत बघतो लोकांचा मोठ्या प्रमाणात वावर चालू होता अनेकांनी भगवंताचा संदेश प्राप्त करून साप्ताहिक कोर्स साठी आपले नाव नोंदविले.

टीम लय भारी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

3 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

4 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

7 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

8 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

9 hours ago