उत्तर महाराष्ट्र

महात्मा ज्योतीराव फुले जयंती उत्सव समिती मार्फत बांधण्यात येणाऱ्या भव्य देखाव्या मंडपाचे भूमिपूजन

थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीराव फुले यांच्या १५४ व्या जयंतीनिमित्त नाशिक शहरात उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त गणेशवाडी भागात जयंती उत्सव समिती मार्फत भव्य देखावा मंडप बांधण्यात येणार आहे. या मंडपाचे भूमिपूजन समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे, कार्याध्यक्ष शशी हिरवे व महिला अध्यक्ष तेजश्री काठे, कार्याध्यक्ष शरद मंडलिक या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जेष्ठ समाज सेवक बाजीराव तिडके, माजी नगरसेवक सुनिल खो डे, विजय राऊत, प्रभाकर क्षीरसागर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. (Foundation stone laying ceremony of grand visual pavilion to be built by Mahatma Jyotirao Phule Jayanti Utsav Samiti)

सालाबाद प्रमाणे महात्मा ज्योतीराव फुले यांची ११ एप्रिल रोजी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्धार उत्सव समितीने केला आहे. नाशिक शहराच्या विविध ठिकाणी असलेल्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्यांची साफसफाई, रंगरंगोटी व सुशोभिकरण उत्सव समितीच्या वतीने करण्यात येत असून समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे, कार्याध्यक्ष शशी हिरवे व महिला अध्यक्ष तेजश्री काठे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे सदस्य जोमाने कार्य करत आहे. यानिमित्ताने गणेश वाडी येथील पूर्णाकृती पुतळ्याजवळ भव्य दिव्य मंडप उभारण्यात येणार असून दरवर्षी प्रमाणे चित्ररथ व भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन आज करण्यात आले. 20 x 60 च्या भव्य स्क्रीन वर दि.१० रोजी पासून क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेनी केलेल्या संघर्षाची माहिती व त्यांचा जीवनपट यावर दाखविण्यात येणार आहे.
या प्रसंगी सह कार्याध्यक्ष दिपक मौले, संदिप गांगुर्डे, शंतनु शिंदे, बच्छाव, भास्करराव जेजुरकर, अशोक जाधव, किशोर भास्कर, संदिप खैरे, संतोष पुंड, संजय अभंग, संजय भडके, सचिन दप्तरे, प्रमोद बनकर, सचिन खोडे, सचिन काठे, संदिप बनकर, नाना नाईकवाडे, अमर तांबे, सचिन जगझाप, महेश दरोडे , सोपान पुंड, शेलार, सतिश गायकवाड, रविंद्र शिंदे ,अरुण थोरात, धनंजय थोरात, सचिन खोडे, विनोद डोखे, महेश ढोले, ज्ञानेश्वर सोमासे, विलास वाघ, संजय अभंग, सचिन काठे, गणेश काठे, तुषार विधाते, अनिकेत प्रमोद बनकर, विशाल जेजुरकर, विवेक सोनवणे, शरद काळे, गणेश खोडे, रामेश्वर साबळे, रमेश गिते, सागर अभंग, सागर पाटील, दिनेश झुटे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, समाज बांधव व समितीमधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टीम लय भारी

Recent Posts

Eknath Shinde | Ajit Pawar | आताच्या राजकारणात लबाडी, पूर्वीचे राजकारण निष्ठेचे अने प्रामाणिकपणाचे

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(In today's politics lies, earlier politics…

10 mins ago

Eknath Shinde सातारचे, पण स्वत:चीच घरे भरतात | उदयनराजे १५ वर्षात आमच्या गावात आले नाहीत

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath shinde is bad CM). गेल्या…

25 mins ago

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

14 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

15 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

17 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

17 hours ago