गुजरातकडून महाराष्ट्रात येणाऱ्या नायट्रोजन गॅस टँकरने (Gas tanker) अचानक पेट(fire) घेतल्याची घटना सोमवारी सकाळी धुळ्याजवळ नागपूर-सुरत महामार्गावर घडली. पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक थांबवून अग्निशमन बंबाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणली. या घटनेत जीवितहानी झाली नाही. काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली.गुजरातहून महाराष्ट्रात नायट्रोजन गॅस असलेला टँकर (Gas tanker) येत असताना धुळ्याजवळ अचानक टँकरने पेट (fire) घेतला. सकाळी नागपूर-सुरत महामार्गांवर साक्री तालुक्यातील घोडदे शिवारात ही घटना घडली.(Gas tanker catches fire near Dhule)

टँकरच्या चालक कक्षापर्यंत आग पोहोचल्याचे लक्षात येताच चालकाने उडी घेतली. यानंतर आग वाढली. टँकरची पुढील चाके आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग वाढत असल्याने आणि महामार्गावरील वाहतूक सुरु असल्याने धोका ओळखून ग्रामस्थांनी पोलिसांना यां घटनेची माहिती दिली.

पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, उपनिरीक्षक रवंदळ, संतोष तोटे, मंगेश खैरनार, निखिल काकडे, रामलाल अहिरे यांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु केले. अग्निशमन दलाशी संपर्क साधल्यानंतर अग्निशमन बंब त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. थोड्याच वेळात आग विझविण्यात आली. दोन्ही बाजूची वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. आगीत टँकरची पुढील चाके तसेच चालक कक्ष खाक झाले. या घटनेची नोंद साक्री पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

टीम लय भारी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

3 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

3 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

3 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago