उत्तर महाराष्ट्र

हातात सत्ता द्या, भोंगे बंद करतो मनसे अध्यक्ष राज ठाकरे ; हिंदुत्वाची हुंकार

राज्यात भोंगे बंद आंदोलनानंतर ठाकरे सरकारने १७ हजार पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. तरी देखील ते स्वत:ला हिंदुत्ववादी समजतात. काय चुकिंच केलं. मुस्लिम समाजाला देखील या भोंग्यांचा त्रास होतो. आताचं सरकार देखील भोंगे कारवाईबाबत डरपोक असून राज्य माझ्या हातात द्या सर्व भोंगे बंद करतो. कोणामध्ये हिमंत पाहू, असा दम भरत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासह भाजप व शिंदे सरकारवर टीका करत हिंदुत्वाची हुंकार भरली.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन शनिवारी (दि.९) दादासाहेब गायकवाड सभागृहात पार पडला.

यावेळी राज्यभरातून आलेले नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी त्यांनी मनसेचे आंदोलने, टोल प्रश्न, मराठा आरक्षणासह सध्याच्या जातीपातीच्या सुरु असलेल्या राजकारणाचा खास ठाकरे शैलीत समाचार घेतला. १८ वर्ष तुम्ही माझ्यासोबत राहिलात हे मी भाग्य समजतो. या प्रवासात चढ कमी उतार जादा पाहिले. पण आपल्याला यश निश्चित मिळणार.इतर पक्षांचे आता यश दिसते. २०१४ ला मोदीचं यश सर्वांनी पाहिले.पण त्याचे संपूर्ण श्रेय पक्ष कार्यकर्त्यांच आहे. आधीचा जनसंघ व नंतरचा भाजप यांनाही लगेच यश मिळाले नाही याकडे लक्ष वेधत तुम्हाला यश मिळवून देणार असा शब्द देत त्यासाठी सयंम ठेवा, असा सल्ला त्यांनी दिला. सध्याच्या राजकारणाचा चिखल झाल्याचे सांगत मला माझ्या कडेवरती माझी पोर खेळवायची आहेत.सध्या दुसर्‍याची पोर खेळवायचे काम सुरु आहे. त्यात कसला आनंद. माझ्यात तेवढी ताकद आहे असे सांगत पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाचा त्यांनी समाचार घेतला. मागील अठरा वर्षात यशस्वी आंदोलने केली. मराठी माणसासाठी, मोबाईलवर मराठी रिंगटोन एेकू यावी, टोलनाके बंद केले, मराठी पाट्या, भोंगे अशा अनेक मुद्यांवर आंदोलने केली. टोल आंदोलनावर माझी भुमिका स्वच्छ होती. जगभरात टोल सिस्टिम आहे. पण किती पैसा येतो व कुठे जातो हा जाब मी विचारला. एक आंदोलन दाखवा त्याचा शेवट केला नाही, असे सांगत धरसोड अशी टिका करणार्‍यांना त्यांनी जाब विचारला.ऐवढे यशस्वी आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाने केली नाही असा दावा त्यांनी केला. आपल्या विरोधात अपप्रचार करतात त्यांना सडकून सांगा असा आदेश ठाकरे यांनी दिला. सध्याचे महाराष्ट्राचे राजकारण आढावरचं पाणी असून हाताला काही लागणार नाही असे सर्वांना सावध करत जे जे काही महाराष्ट्र व हिंदूंसाठी करता येईल ते करु. नवा महाराष्ट्र घडवूया अशी शपथ त्यांनी मनसे सैनिकांना दिली.
यावेळी अमीत ठाकरे, संदिप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, आ.प्रमोद पाटिल,शिरिष सावंत, संजय चित्रे, अनिल शिदोरे, जयप्रकाश बाविस्कर, अभिजीत पानसे, दिलीप धोत्रे, अविनाश जाधव, राजू उबंळकर, शालिनी ठाकरे आदींसह सर्व प्रमुख नेते अधिवेशनाला हजर होते.

पटेल यांचे स्मारक झाले, महाराजांचे नाही
अरबी समुद्रात होऊ घातलेल्या
शिवाजी महाराज स्मारक कामावरुन त्यांनी भाजपला घेरले. पंतप्रधान आले व फुल वाहिले. पुढे काय झालं, असा प्रश्न विचारत गुजरातला सरदार वल्लभ भाई पटेल यांचे स्मारक झाले पण शिवाजी महाराजांचे झाले नाही, अशी टीका त्यांनी भाजपवर केली. समुद्रात स्मारक उभे करण्यासाठी भर टाकावी लागेल. त्यासाठी तीस हजार कोटी खर्च येइल. त्याऐवजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे जतन केले पाहिजे. तेच खरे स्मारक असून भविष्यात नवीन पिढिला पुतळे दाखवणार का ? असा सवाल त्यांनी सत्ताधार्‍यांना विचारला.

राष्ट्रवादी आतून एकच

राष्ट्रवादी काॅग्रेसवर टीका करताना त्यांना मी पक्ष म्हणार नाही. पवार यांनी फक्त निवडून येणार्‍यांची मोळी बांधली. पवार नेहमी हेच करत आले अशी टीका ठाकरे यांनी केली. राष्ट्रवादी जरी फूट दिसत असली तरी आतून हे सर्व एकत्र आहे, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना लगावला.

देशाला मराठा एकत्र नको
महाराष्ट्राच्या मातीत जातीपातीच विष पसरवलं जात आहे. मी जेव्हा जरांगे पाटिल यांना भेटलो तेव्हा आरक्षण तांत्रिकदृष्ट्या मिळणे शक्य नाही, असे स्पष्ट सांगितल्याचे ठाकरे म्हणाले.
या अगोदर प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे निघाले. काय झालं. भुल थापांना बळी पडू नका. राजकारण्यांनी
जातीजाती त विष कालवल असून महापुरुषांचे वाटप करुन ठेवलं. मत विभागणीसाठी ही भांडणे लावले जात असल्याची टीका ठाकरे यांनी केली.
देशाला मराठा एकत्र नको असून त्यांचे हे धंदे अोळखा असे आवाहन त्यांनी केले.

टीम लय भारी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

3 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

5 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

7 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

9 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

10 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

10 hours ago