उत्तर महाराष्ट्र

सारिका सोनवणे तक्रार अर्जातील “त्या” व्यक्तीची व खंडणीची फिर्याद देणाऱ्या निंबा मारुती शिरसाटची चौकशी करून नार्को टेस्ट करा; गजू घोडके

गजू घोडके (Gaju Ghodke ) यांनी दिलेल्या अर्जाचा मजकूर सारिका सोनवणे (Sarika Sonawane) नामक पीडितेने आपल्यावर झालेल्या अन्याय अत्याचारसंदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता. परंतु त्या तक्रारीतील व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल न करता पोलिसांनी तिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. सदरचे प्रकरण हे हायप्रोफाईल असल्याचे समाज माध्यमांमध्ये चर्चा होऊ लागली. त्यानंतर तिला, तिच्या भावाला व मुलाला अटक करण्यात आली. ती बाहेरी आली. परंतु या प्रकरणातील खरा “आसाराम बापू” कोण ? हे मात्र बाहेर आले नाही. यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी पीडित महिलेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा. अशी माझी माफक अपेक्षा आहे.(Investigate the “person” in the Sarika Sonawane complaint form and Nimba Maruti Shirsat, who filed the extortion complaint, and conduct a narco test; Gaju Ghodke )

त्या पीडित महिलेचा व त्या बाबाचा व्हिडिओ काही जणांनी प्रत्यक्ष बघितला असून त्याबद्दल देखील खरी खुरी चर्चा आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झालेले आहे. अन्यथा सदर प्रकरण जे समाजामध्ये व्यक्त होत आहे. ते प्रकरण नाईलाजास्तव मीडियाच्या माध्यमातून सत्य मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू. या प्रकरणात माझ्या जिवाचे काहीही झाले तरी चालेल. त्यामुळे कृपया पोलीस आयुक्तांना विनंती आहे की, या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागावा व पीडितेला न्याय मिळावा हीच माझी माफक अपेक्षा आहे.

गेल्या काही महिन्यापूर्वी खाजगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन दिडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राच्या एका विश्वस्ताकडून मोठ्या प्रमाणात खंडणी उकळल्या प्रकरणी कृषी अधिकारी सारिका सोनवणे याना काहीं दिवसांपूर्वी अटक झाल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. परंतु हे प्रकरण फारच गुंतागुंतीचे आहे. नाजू‌क प्रकरण असल्याने समेट आणि आर्थिक देवाण- घेवाण झाल्यानंतर हे प्रकरण खरे तर मिटले होते. मात्र नंतर संबंधितांनी पोलिसाना हाताशी धरून आर्थिक प्रकरणात सदर महिलेस नाहक गुंतवले. असा सदरच्या महिलेचा आरोप होता. न्याय मिळावा यासाठी ती सर्वाची दारे थोतावट होती. मात्र तिला खरा न्याय मिळालेला नाही. हीच खरी समाजाची खंत आहे.

या पिडीत महिलेने वेळोवेळी खंडणी मागितली. असे गृहीत धरले तरी तिला मोठी रक्कम देण्यासाठी दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राच्या विश्वस्ताकडे इतकी रक्कम आली तरी कुठून हा खरा सवाल आहे. त्यांच्याविरुद्ध देखील गुन्हा का दाखल झाला नाही ? याचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. सदरच्या व्हिडिओची फॉरेन्सिक लॅबकडून खातरजमा करण्यात येईल असे आश्वासन विधिमंडळात गृहमंत्र्यांनी दिले होते. मात्र त्याचा अहवाल अ‌द्यापन न आल्याने या प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. व्हिडिओ भलत्याचाच आणि ते दुसऱ्याच्याच नावाने ढकलून त्याच्या नावाने फिर्याद देण्यात आली. असा आमचा आरोप आहे. या प्रकरणाचे सत्य हुडकून काढायचे असेल आणि सदरच्या महिलेस न्याय मिळवून द्‌यायचा असेल तर एसआयटीमार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. तसेच दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख परमपूज्य अण्णासाहेब मोरे यानी समोर येऊन सत्य परिस्थिती सर्वांना सांगणे गरजेचे आहे.

एका सामाजिक कार्यकत्याने या महिलेस मदत करण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारझोड झाल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाचे सत्य उघडकीस यावे. याचा विडा मी उचलला असून सदरच्या महिलेस न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईत मी लवकरच उपोषणास बसण्याचा निर्धार व्यक्त करीत आहे. या प्रकरणात सकल हिंदू समाजास गोवण्याचा होत असलेला प्रयत्न चुकीचा आहे. हिंदू सकल समाजाचा या प्रकरणाची काडीचाही संबंध नाही. याची सर्वांनी दखल घ्यावी. धार्मिक गोष्टीच्या नावाखाली होत असलेले थोतांड थांबवांवे आणि धार्मिक स्थळांच्या प्रमुखांचे आचरण शुद्ध असावे हीच माझी माफक अपेक्षा आहे.

सारिका सोनवणे तक्रार अर्जातील “तो” व्यक्ती व खंडणीची फिर्याद देणारा निंबा मारुती शिरसाट यांची चौकशी करून नार्को टेस्ट करून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष न लावल्यास नाईलाजास्तव मला सारिका सोनवणे हिला न्याय मिळवून देण्यासाठी उपोषणास बसावे आहे. हे आपण कृपया लक्षात घ्यावे. असा अर्ज सामजिक कार्यकर्ते व सकल हिंदू समाजाचे गजू घोडके (Gaju Ghodke ) यांनी पोलीस आयुक्त यांना केला आहे. सदर प्रत मा. पंतप्रधान
मा. गृहमंत्री केंद्रीय, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मा. गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना पाठविली आहे.

टीम लय भारी

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

9 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

9 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

10 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

11 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

13 hours ago