मतमोजणी प्रक्रियेवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा,महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींना कडक सूचना

महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi ) उमेदवार राजाभाऊ वाजे (rajabhau waje) यांच्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रतिनिधींचे प्रशिक्षण शिबीर शिवसेना उबठा गटाच्या शालिमार कार्यालयात घेण्यात आले.ईव्हीएम मतमोजणी पूर्वी बॅलेट युनिट आणि कन्ट्रोल युनिट व्हीव्हीपॅट युनिटचा नंबर 17 C नुसार आहेत की नाही याची तपासणी मतदान मोजणी प्रतिनिधींनी करावी यासह विविध सूचना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिल्या.(Keep an eye on the counting process, strict instructions to Maha Vikas Aghadi representatives)

दि.20 एप्रिल 2024रोजी रोजी बॅलेट युनिट आणि कन्ट्रोल युनिट स्टार्टिंग टाइम व क्लोजिंग टाईम आयोगाने दिलेल्या वेळेनुसार ऑपरेट झाले आहे की नाही याची खात्री करावी.बूथ मध्ये झालेले मतदान प्रत्येक उमेदवाराला मिळालेले मतदान टॅली होते कि नाही त्याबाबत पडताळणी करावी.तसेच कन्ट्रोल युनिट व बॅलेट युनिट बॅटरी चार्ज किती टक्के आहे.बदललेली असेल तर फुल चार्ज असेल मतदान करते वेळी बॅटरी मशीनमध्ये असेल तर ती 20 ते 25 टक्के बॅटरी चार्ज असेल याची पण पडताळणी करावी असेही बडगुजर पुढे म्हणाले. शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी प्रास्तविक केले. मतमोजणी प्रतिनिधींनी डोळ्यात तेल घालून मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवावे.थोडी जरी शंका आली तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ती बाब आणून द्यावी,असेही शिंदे यांनी सांगितले.

संहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड,राष्ट्रवादी शरद पवार त्याचे शहराध्यक्ष गजानन शेलार,माजी आमदार वसंत गिते,जेष्ठ शिवसैनिक अनंत जगताप,यांनीही मार्गदर्शन केले. शिक्षकमतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन सचिन बांडे यांनी केले. व्यासपीठावर माजी महापौर विनायक पांडे,कोर कमीटी सदस्य डी.जी सूर्यवंशी,मनोहर मेढे, शिवसेना उप जिल्हाप्रमुख जगनराव आगळे,निवृती लांबे, देवानंद बिरारी,महेश बडवे,सचिन मराठे,विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे,सुभाष गायधनी,शैलेश सूर्यवंशी,शिक्षक सेना उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी संजय चव्हाण, माजी स्थायी समितीसभापती संजय चव्हाण,बागलाण विधानसभा सपर्कप्रमुख विकास गिते,विधानसभा मतदार यादी प्रमुख मसुद जिलानी,नीलेश साळुंखे आदी उपस्थित होते.

टीम लय भारी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

1 week ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

1 week ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

1 week ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago