उत्तर महाराष्ट्र

महात्मा फुले जयंती भव्य चित्ररथ मिरवणूक जल्लोषात

थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीराव फुले (Mahatma Phule Jayanti ) यांच्या जयंतीनिमित्त मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात व फटक्यांच्या आतिषबाजीमध्ये जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आदिवासी सांस्कृतिक नृत्य हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले.सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत गणेश वाडी येथील मनपा क्र ३० येथील पूर्णाकृती पुतळ्यास महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुतळ्याभोवती असणारा भव्य मंडप व आकर्षक सजावटीमुळे सर्वाच्या डोळ्याचे पारणे फिटले. (Mahatma Phule Jayanti grand chitraratha procession)

तसेच 20 x 60 च्या भव्य स्क्रीनवर क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंनी केलेल्या संघर्षाची माहिती व त्यांचा जीवनपट बघून उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले होते.
जुने नाशिक येथील महालक्ष्मी चाळ येथून संध्याकाळी मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वी महात्मा फुले यांच्या अर्धकृती पुतळ्याला मंत्री छगनरावजी भुजबळ, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमाताई हिरे, जेष्ठ नेते नानासाहेब महाले, लक्ष्मण सावजी, बाळासाहेब कर्डक, शिवसेना जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाना शिलेदार, नगरसेविक अर्चना थोरात, नयना गांगुर्डे, प्रकाश लोंढे, कविता कर्डक, संजय साबळे, दिनकर पाटील, गजानन शेलार, अनिल जाधव, महेश हिरे, बबलू शेलार, मामा राजवाडे, बाजीराव तिडके, बाळासाहेब जानमाळी आदींसह विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत संत सावता माळी फाउंडेशन, दंडे हनुमान मित्रमंडळ, निर्मिक फाउंडेशनचे चित्ररथ होते.मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात विविध मंडळाचा लक्षणीय सहभाग दिसून आला. प्रत्येक मंडळाचा विविध देखाव्याचा साधारणपणे २० चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. उत्सव समितीच्या वतीने या भव्य मिरवणुकीत महात्मा ज्योतीराव व सावित्रीबाई फुले तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रमाई यांच्या देखाव्याची घोडा बग्गी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. जीवंत देखावा मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. यावेळी मिरवणूक मार्गातील विविध पुतळ्याना अभिवादन करण्यात आले. तसेच पारंपारिक भव्य ढोल पथक, बँड पथकासह महात्मा फुलेंची पालखी काढण्यात आली. महिलानी फुगड्या खेळून आनंदोत्सव साजरा जल्लोष केला. यावेळी मिरवणुकीतील महिला व पुरुषांनी डोक्यावर फेटे परिधान केले होते. यासह वारकरी संप्रदाय, आदिवासी नृत्यपथक, वासुदेव वेशभूषा असे विविध देखावे बघण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण-तरुणी, समाजबांधव व नाशिककर आपल्या कुटुंबांसह या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक बागवानपुरा, वाकडी बारव, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली, मेनरोड, धुमाळ पॉइंट, दहीपूल, संत गाडगे महाराज पुलावरून गणेशवाडी येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ रात्री पोहचली. महात्मा फुले जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी मंडळांनी डीजेला फाटा दिल्याचे चित्र पहावयास मिळाले. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरातच मिरवणूक काढण्यात आली होती. यामुळे ध्वनिप्रदूषणाला निश्चितच आळा बसण्यास मदत होत आहे. नाशिककरांनी पाडलेला हा नवीन पायंडा पर्यावरणपूरक असल्याने उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे, कार्यकारी अध्यक्ष शशी हिरवे, महिला अध्यक्ष तेजश्री काठे, कार्याध्यक्ष शरद मंडलिक व सह कार्याध्यक्ष दिपक मौले यांचे नाशिककरांनी आभार मानले.

उपाध्यक्ष शंतनू शिंदे, मोहन माळी, सुरेश दलोड, श्रीराम मंडळ, संदीप बनकर विशाल जेजुरकर, राहुल घोडे, नंदू कहार, भूषण शिरसाठ, सुभाष काठे, खजिनदार संदिप गांगुर्डे, सह खजिनदार नाना नाईकवाडे, सरचिटणीस भास्कर जेजुरकर, ज्ञानेश्वर सोमासे, सोपान पुंड, संजय अभंग, गणेश खोडे, तुषार विधाते, गणेश काठे, शहर संघटक पप्पु शिंदे, प्रमोद बनकर, महेश ढोले, विनोद डोके, विलास वाघ, पप्पू शिंदे, रामेश्वर साबळे, सागर बेदरकर, प्रसिद्धी प्रमुख संदिप खैरे, संतोष पुंड, सागर वझरे, विभाग प्रमुख द्वारका सचिन काठे, मध्य नाशिक रुपेश शेवाळे, नासिक रोड विशाल गाडेकर, जेलरोड स्वप्निल फुले, पंचवटी दिपक मंडलिक, उपनगर ज्ञानदेव जाधव, संजय रासकर, आडगाव सचिन खोडे, मखमलाबाद धनंजय थोरात, नविन नाशिक कृष्णा काळे, सिडको अमोल नाईक, सातपूर विवेक सोनवणे, आनंदवली शरद काळे, पाथर्डी फाटा सागर गाडेकर, इंदिरानगर निलेश खोडे, महिला कार्यकारणी द्वारका भारतीताई शेलार, पंचवटी दिप्ती हिरवे, आडगाव कोमल खोडे, मखमलाबाद राजश्री गायकवाड, सातपूर संजीवनी जाधव, सिडको हर्षा फिरोदिया, आनंदवली स्वाती शेलार, इंदिरानगर संगीता गीते, पाथर्डी फाटा अर्चना महाजन आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago