उत्तर महाराष्ट्र

‘मराठा समाजाने काळाची पावले ओळखावीत’ मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांचे प्रतिपादन

मराठा समाजाने (Maratha community) काळाची पाऊले ओळखून स्वतःमध्ये बदल करून घेतले पाहिजेत,आधुनिक पद्धतीने शेती कसली पाहिजे,समाजातील युवक युवतींनी नवनवीन उद्योग सुरू करावेत.स्वतःला सिद्ध केले पाहिजे.समाजाने अवांतर खर्चावरती आळा बसवला पाहिजे असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज) (Maratha community संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे (Nitin Thakre) यांनी व्यक्त केले.नाशिक जिल्हा मराठा सेवा संघ,मराठा विद्या प्रसारक समाज संस्था आणि मराठा शुभ लग्न डॉट.कॉम.च्या वतीने समाजातील सेवानिवृत्त अधिकारी वर्गाचा सेवापूर्ती समारंभ,मराठा सेवा संघाच्या विविध ३२ कक्षाच्या पदग्रहण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.(‘Maratha community should recognise the steps of time’: MVP general secretary Nitin Thakre)

सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
योगिता सोनवणे,प्रणिता गायकवाड,स्मिता आहेर,सारिका पाटील यांनी जिजाऊ वंदना गाऊन कार्यक्रमाचे सुरुवात केली.

यावेळी विचारपीठावर माजी आमदार डॉ.सुधीर तांबे,मविप्र संचालक ॲड संदीप गुळवे,ॲड महेश लांडगे,महानगर विकास प्राधिकरण आयुक्त सतीश खडके,सेवानिवृत्त महसूल उपायुक्त रमेश काळे,ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालिका प्रतिभा संगमनेरे,जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा फडोळ,आबासाहेब तांबे,मराठा सेवा संघ राज्य उपाध्यक्ष महेंद्र पवार,के.डी.पाटील,माजी पोलीस उपायुक्त नवलनाथ तांबे,माधुरी भदाणे,शरद पवार,तहसीलदार कुंदन हिरे,माजी वनसंरक्षक पि.एन.पाटील,मविप्र संचालक तथा नाशिक ग्रामीण मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष डॉ.प्रसाद सोनवणे,मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे,महानगर जिल्हाध्यक्ष इंजि.स्वप्निल पाटिल,इंजि.नितीन मगर,इंजि.हंसराज वडघुले,इंजि.जितेंद्र पाटील,इंजि.नितीन पाटील आदी उपस्थित होते.

ॲड.नितीन ठाकरे पुढे म्हणाले की मराठा सेवा संघाने मराठा समाजातील जुन्या रुढी परंपरा,अंधश्रद्धा याचा त्याग करत समाज पुढे आणून एक संघटन तयार केले.३२ कक्षाच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये प्रबोधनाचे संस्कार रुजविले.उद्योग,कृषी,शिक्षण,इतिहास,सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक,प्रचार-प्रसार माध्यम सहकार,आदी बाबत जनजागृती करून संघटन उभे केले. मराठा सेवा संघाचे हे कार्य क्रांतिकारी स्वरूपाचे आहे असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ.प्रसाद सोनवणे यांनी आजच्या काळात मराठा सेवा संघाच्या विचाराची गरज आणि सेवा संघाची भूमिका विशद केली.समाजातील मान्यवरांनी मराठा सेवा संघाच्या विविध उपक्रमांसाठी स्वतःच्या मालकीची इमारत उभी करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.सुधीर तांबे यांनी मराठा सेवा संघाने मराठा समाजातील नवशिक्षित तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास निर्माण केला.त्यांना चुकीच्या मार्गाने न जाऊ देता त्यांच्यात आत्मभान आणले.२१ व्या शतकाच्या आव्हानासाठी त्यांचे मन,मणका आणि मेंदू तयार केला.मराठा सेवा संघाशी जोडली गेलेली व्यक्ती ही आधुनिक विचाराची व परिवर्तनशील बनते असे गौरव उद्गार काढले.समाजातील युवक युवतींनी केवळ राजकारणाकडे लक्ष न देता प्रशासन पद प्राप्त केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त महसूल उपायुक्त रमेश काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.सिताराम कोल्हे यांचा सत्कार केला.तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगातून निवड झालेले सुरज प्रभाकर निकम यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह,शिवधर्म दिनदर्शिका,ग्रंथ भेट आणि पुष्प देऊन करण्यात आला.

सत्कारमूर्ती सेवानिवृत्त महसूल उपायुक्त रमेश काळे आपल्या मनोगतात म्हणाले की समाजातील प्रशासकीय अधिकारी यांनी समाजाचे ऋण फेडण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.बहुसंख्य मराठा समाज आजही दारिद्र्यांमध्ये खितपत पडलेला आहे.त्यांचे आर्थिक प्रश्न गंभीर आहेत.मराठा समाजाला आपल्या अधिकार हक्काबाबत जागृत करणे हे आपले काम आहे. ते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले पाहिजे.सेवानिवृत्त नंतर मी समाजाशी बांधिल आहे.समाजाच्या प्रश्न सोडवणुकीसाठी मी कायम पुढाकार घेईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.सीताराम कोल्हे तरुणांनी मानसशास्त्रीय दृष्ट्या सशक्त असणे गरजेचे असून यापुढील काळात तरुणांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

महानगर विकास प्राधिकरण आयुक्त सतीश खडके मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की युवकांनी महाविद्यालयीन जीवन जगत असताना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी केली पाहिजे, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत त्यासाठी योग्य ते शिक्षण समाजातील विद्यार्थ्यांनी घेतले पाहिजे असे मत व्यक्त केले.
मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे यांनी मराठा सेवा संघाच्या स्थापनेमागील भूमिका सांगून त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा आढावा घेतला.
यावेळी मराठा सेवा संघाच्या विविध कक्षामधील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
नवनिर्वाचित उद्योजक कक्षाचे विभागीय अध्यक्ष इंजि.विशाल देसले,जिल्हाध्यक्ष उमेश शिंदे,न्यायदान कक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन ठाकरे,

संगीत कक्षाचे जिल्हाध्यक्ष अश्विन पाटील,शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा ढगे,आरोग्य कक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ठाकरे,क्रीडा कक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे,मराठा वस्तीगृह कक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रसन्न तांबे,पत्रकार कक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोहर पाटील,व्यसनमुक्ती कक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाश ढोले,कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष कैलास साबळे,वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष राम खुर्दळ, तुकोबाराय साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष भास्कर ढोके,मराठा गृहनिर्माण कक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल ठाकरे,मराठा बालकल्याण कक्षाचे जिल्हाध्यक्ष अश्विनी न्याहारकर,मराठा विद्यार्थी दत्तक कक्षाचे विवेक कापडणीस,महात्मा फुले इतिहास अकादमीचे जिल्हाध्यक्ष महेश वाघ,संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.नितीन जाधव,वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष तन्मय जगताप,राजर्षी शाहू शिक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद रोंदळ,मराठा विश्व शाहीर कक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम गायकर,मराठा ज्येष्ठ नागरिक कक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पाटील,वधू-वर कक्षाचे हेमंत पगार,नितीन मगर,मराठा विज्ञान व तंत्रज्ञान कक्षाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील,मराठा अर्थकोश कक्षाचे जिल्हाध्यक्ष उल्हास बोरसे,मराठा समन्वय कक्षाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव सावंत यासह मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र निंबाळते,संघटक प्रमोद आहेरराव,सहसंघटक विठ्ठल शिंदे,सिन्नर तालुकाध्यक्ष अनिल गडाख,निफाड तालुकाध्यक्ष राजेश खापरे,येवला तालुकाध्यक्ष बाजीराव सोनवणे कार्याध्यक्ष मालेगाव तालुकाध्यक्ष शरद बच्छाव,चांदवड तालुकाध्यक्ष नवनाथ आहेर,कळवण तालुकाध्यक्ष दीपक देवरे,दिंडोरी तालुकाध्यक्ष डॉ.विष्णू मोरे,इगतपुरी तालुकाध्यक्ष निलेश पाटील यांची नेमणूक केली या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

दुसऱ्या सत्रामध्ये राज्यस्तरीय वधू-वर आणि पालक मेळावा हेमंत पगार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ.ज्ञानोबा ढगे यांनी केले तर आभार इंजि.स्वप्निल पाटील यांनी मानले.

टीम लय भारी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

3 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

3 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

3 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago