पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर दिवसेंदिवस वाढणारा ताणतणाव लक्षात घेता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी मानसिक आरोग्य व ताणतणाव नियोजन कार्यशाळेचे आयोजन केले होते. पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेस पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, डॉ. अनुप सुभाष भारती, (एम.बी.बी.एस., एम. डी. मानसोपचार तज्ञ. विभाग प्रमुख, (मानसोपचार विभाग ) डॉ. वसंतराव पवार वैदयकिय महाविदयालय, नाशिक, डॉ. मुक्तेश काकासाहेब दौंड, (एम.बी.बी.एस., डी. एन. बी. मानसोपचार तज्ञ व व्यसनमुक्ती तज्ञ. डॉ. प्रशांत देवरे, डॉ. गिरीष देवरे, पोलीस रुग्णालय, नाशिक हे उपस्थित होते.
पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे कर्तव्य बजावत असतांना त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे आणि त्यांच्या स्वास्थ्याकरीता पोलीस आयुक्तालय, पोलीस कल्याण-प्रशिक्षण शाखे अंतर्गत गुरुवार दि. २९ रोजी भिष्मराज बाम हॉल, पोलीस मुख्यालय येथे मानसिक आरोग्य व ताणतणाव नियोजन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेत तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, अंमलदार यांना मानसिक आरोग्य व ताणतणाव याबाबत मार्गदर्शनपर समुपदेशन केले. समुदेशन करतांना मानसिक ताणतणाव आजार याबाबत ओळख होणे, आवश्यक असल्याने दृष्टीस येणारे लक्षणांची माहिती दिली. तसेच, मानसिक आरोग्य व ताणतणाव नियोजन करण्यासाठी सामाजिकष्टया आणि कौटुंबिकदृष्टया खंबीर असणे आवश्यक असून, कामाचे नियोजन व कामाची व्यापकता देखील मानसिक आरोग्यावर परिणाम करते असेही यावेळी सांगण्यात आले. तसेच हे याबाबत माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कर्तव्य बजावतांना येणाऱ्या मानसिक तणावा संदर्भाने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
तर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार यांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी संवाद साधावा आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात आणि त्यांना योग्य मार्गदर्शन आणि मदत करण्याचे आवाहन केले.
सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…
स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…
भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…
कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…
डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…