उत्तर महाराष्ट्र

नाशिक शहरात 335 CCTV कार्यन्वित होण्यासाठी आता जुलैचा नवा मुहूर्त

नाशिक महापालिका आणि शहर पोलिसांनी लवकरच पंचवटी येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात आणि पोलिस आयुक्तालयात कार्यान्वित होणाऱ्या सीसीटीव्ही ( CCTV) नियंत्रण कक्षासाठी ( कमांड अँड कंट्रोल रूम) कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी विनंती नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने केली आहे.
स्मार्टसिटी कंपनीकडून कमांड आणि कंट्रोल रूमला सीसीटीव्ही जोडण्याचे काम सुरू असून जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. यामुळे जुलैपासून शहरातील ३३५ ठिकाणी ८०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही ( CCTV) सुरू होणार असल्याचे स्मार्ट सिटी कंपनीकडून सांगण्यात येत आहे. यापूर्वी स्मार्टसिटी कंपनीने १५ मेपर्यंत काम पूर्ण होणार असल्याचे पोलिस आयुक्तालयास कळवले होते. दरम्यान ती मुदत टळल्यानंतर स्मार्टसिटी कंपनीकडून सीसीटीव्ही ( CCTV) प्रकल्प हस्तांतरण प्रक्रिया सुरू केली आहे.(Nashik city now has a new time in July to implement 335 CCTVs.)

नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन अर्थास स्मार्टसिटी कंपनीच्या वतीने नाशिक शहरात सर्विलन्स, वाहनांच्या नंबरप्लेट व रात्रीच्या वेळी प्रतिमा घेऊ शकणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे.साधारणपणे ३७१ ठिकाणी ८०० कॅमेरे बसवले जाणार आहेत. तसेच ५० ठिकाणी वायफाय, २० ठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टिम, २६ ठिकाणी पर्यावरण सेंसर व २० ठिकाणी पूर सेंसर उभाऱण्यात येणार आहेत. केंद्र व राज्याच्या सूचनेनुसार १५९ कोटींचे हे काम महाआयटी या कंपनीला चार वर्षापूर्वी दिले असून ते काम अंतिम टप्प्यात असून १५ मे रोजी ते पूर्ण होणार आहे.

या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना ई- चलनाद्वारे दंडात्मक आकारणी केली जाणार आहे. त्याचबरोबर मुख्य रस्त्यांवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठीदेखील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत घेतली जाणार आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना ई-चलनाद्वारे दंडात्मक आकारणी केल्यानंतर तो निधी थेट गृहविभागच्या खात्यात जमा होणार आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी काम पूर्ण करण्याचा शब्द कंपनीने पूर्ण केला होता. त्यानुसार स्मार्टसिटी कंपनीकडून महापालिका व पोलिस आयुक्तालय यांच्याकडे प्रकल्प हस्तांतरणाचे काम सुरू झाले आहे, असे स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी सांगितले.
या सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेचे नियंत्रण कक्ष (कमांड आणि कंट्रोल रूम) महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयात व पोलिस आयुक्तालय या दोन ठिकाणी असणार आहेत. यामुळे पंचवटी विभागीय कार्यालयात १६ जणांचे पथक कमांड आणि कंट्रोल रूमचे काम पाहतील, तर आणखी १२ जणांचे पथक पोलिस आयुक्तालयात तैनात असणार आहेत. या दोन्ही ठिकाणांच्या समन्वयातून सीसीटीव्हीवर आधारित निर्णय घेतले जाणार आहेत.

स्मार्ट सिटी कंपनीने संपूर्ण शहरात ३३५ ठिकाणी ८०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही बसवले आहेत. या दोन्ही कमांड आणि कंट्रोल रूमला सीसीटीव्ही जोडण्यासाठी ८५ किलोमीटर लांबीच्या ऑप्टिकल फायबर लाईनचे जाळे टाकण्याचे काम ७५ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम दोन आठवड्यात पूर्ण होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांचे म्हणणे आहे.त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात कमांड आणि कॉल रूम दोन्ही कार्यान्वित होऊ शकणार आहे. स्मार्टसिटी कंपनीकडून ३३५ सीसीटीव्ही बसवले असून त्यातील २२५ ठिकाणे ही पोलिस आयुक्तालयाने, तर उर्वरित ११० ठिकाणे महापालिकेने निश्चित केली आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

2 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

4 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

6 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

8 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

9 hours ago