उत्तर महाराष्ट्र

मतदान जनजागृतीच्या घोषणांनी नाशिक शहर दुमदुमले

नाशिक महानगरपालिका, जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालय, पोलिस आयुक्त कार्यालय आणि किंग्स ऑफ रोडस व सुपर बाइकर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वीपअंतर्गत मतदार जनजागृतीसाठी बाइक व कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मतदार जनजागृतीच्या घोषणांनी(slogans of voter awareness ) रॅलीचा मार्ग परिसर दुमदुमून (Nashik city rocked) गेला होता. त्या माध्यमातून नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले होते. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील प्रवेशद्वारापासून बाइक व कार रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.(Nashik city rocked by slogans of voter awareness)

यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जतिन रहेमान, पोलिस उपायुक्त बच्छाव, किरण चव्हाण, खांडवी, मोनिका राऊत, जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी परदेशी, दीपक चंदे उपस्थित होते. रॅली यशस्वीतेसाठी विभागीय अधिकारी राजाराम जाधव, योगेश रकटे, मदन हरिश्चंद्र, सुनीता कुमावत आदींनी परिश्रम घेतले.

लोकशाहीचे एकच अनुष्ठान,

करा आपले मतदान

बाइकस्वारांच्या हातातील या फलकांनी रस्त्यावरील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. बाइक रॅलीच्या पाठोपाठ मनपाचे अधिकारी व कर्मचारी बाइकवर सहभागी झाले होते. महापालिकेची वाहने या रॅलीत सहभागी झाली होती. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथून कॅनडा कॉर्नर, कॉलेजरोड, भोसला कॉलेज मार्गे, जेहान सर्कल, डोंगरे वसतिगृहासमोरून अशोकस्तंभ, घारपुरे घाट मार्गे मालेगाव स्टँड दिंडोरी नाका, पंचवटी कारंजा मार्गे रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल शालीमार येथून गडकरी चौक, एलआयसी सिग्नल, एबीबी सर्कल मार्गे गंगापूर गांवा गुप्ता उद्यान येथे समारोप झाला.पंचवटी कारंजा मार्गे रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल शालीमार येथून गडकरी चौक, एलआयसी सिग्नल, एबीबी सर्कल मार्गे गंगापूर गांवा गुप्ता उद्यान येथे समारोप झाला.

रॅलीतून मतदारांना आवाहन

नाशिक मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथून निघालेल्या बाइक व कार रॅलीच्या अग्रभागी जनजागृती करणारे वाहन त्याद्वारे बाइक रॅली व कार रॅलीचे माहिती देऊन मतदार जनजागृतीबाबत आवाहन केले जात होते. त्या पाठोपाठ असणाऱ्या उघड्या जिप्सी वाहनास फुग्यांनी सजविण्यात येऊन त्यामध्ये कार्यक्रमास उपस्थित मान्यवर विराजमान झालेले होते. त्यांच्या माध्यमातून या वाहनातून मतदान जनजागृती करण्यात येत होती. त्या पाठोपाठ बाइकवर पोलिसांचे दामिनी मार्शल पथक सहभागी झालेले होते.त्यांच्या माध्यमातून या वाहनातून मतदान जनजागृती करण्यात येत होती. त्या पाठोपाठ बाइकवर पोलिसांचे दामिनी मार्शल पथक सहभागी झालेले होते.

टीम लय भारी

Recent Posts

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

13 mins ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

3 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

3 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

3 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

4 hours ago

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

7 hours ago