उत्तर महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यात मार्च मध्येच बसताय पाणीटंचाईच्या झळा

मराठवाडा, नगर आणि मुंबईच्या काही भागाला पाणीपुरवठा करणारा नाशिक जिल्हा सध्या दुष्काळाच्या झळा सहन करीत आहे. पाणीटंचाईची तीव्रता वाढत असताना जिल्ह्यात १८६ गावे व ४०९ वाड्या अशा एकूण ५९५ गावे-वाड्यांना १९१ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विभागात नाशिक जिल्हाच सर्वाधिक तहाणला आहे. धुळे जिल्ह्यात सध्या एका टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून, नंदुरबार जिल्ह्यात अद्याप टँकरची गरज भासलेली नाही. जळगाव जिल्ह्यातील २४ गावांमध्ये २९ टँकरद्वारे व नगरमध्ये ३२२ गाव-वाड्यांना ४९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.गेल्या वर्षी सुरुवातीपासूनच दडी मारलेल्या पावसाने नाशिक जिल्ह्यासह राज्यावर शेवटपर्यंत अवकृपा केली. संपूर्ण हंगामात पाऊस वार्षिक सरासरी गाठू शकला नाही.(Nashik district reels under water shortage in March)

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०२३ या चार महिन्यांत फक्त ६८.९२ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे पावसाची २०२२ सालच्या तुलनेत तब्बल ३१ टक्के तूट होती, त्याचा फटका आता पिण्याच्या पाण्यासह सिंचनाला बसत आहे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता आणि पाण्याची मागणी एकाचवेळी वाढू लागली आहे. विशेषत: ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होऊ लागल्याने टँकरद्वारे पाणी पुरवा, अशी मागणी ग्रामस्थ करीत असून,आतापर्यंत तब्बल ५९५ ठिकाणी १९१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टँकर्सची द्विशतकाकडे वाटचाल सुरू असून, मागणी वाढतच जाणार आहे.

यंदा जिल्हावासीयांना कडक उन्हाळ्याचा सामना करावा लागणार आहे. आताच उन्हाचा पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. होळीनंतर व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नाशिकचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी पाऊस सरासरी गाठू न शकल्याने जिल्ह्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरू शकली नाहीत. त्याचे परिणाम डिसेंबरपासून प्रकर्षाने जाणवण्यास सुरुवात झाली. पावसाळा संपताच जिल्ह्यात अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. तसे प्रस्ताव ग्रामपंचायतींकडून पंचायत समित्या, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त होऊ लागले आहेत. ग्रामस्थांची पाण्यासाठीची पायपीट थांबविण्यासाठी मागणी होईल तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे धोरण प्रशासनाने अवलंबले आहे.

जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांमध्ये २२ हजार ८५१ दशलक्ष घनफूट म्हणजे केवळ ३४.८० टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण ४९ टक्के म्हणजे १५ टक्क्यांनी अधिक होते. पुरेशा पावसाअभावी बहुतांश धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झालेला नव्हता. नंतर समन्यायी तत्त्वाच्या आधारे काही धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडावे लागले. त्यामुळे जिल्ह्यातील जलसाठा खालावला आहे. जिल्ह्यात सध्यस्थितीत नागासाक्या धरण कोरडेठाक पडले आहे. सहा धरणांत २० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाºया गंगापूर धरण समुहात ४८.७९ टक्के साठा आहे. यात गंगापूर धरणात ४९, काश्यपी ५०, गौतमी गोदावरी ४९ आणि आळंदी ४१ टक्के साठा आहे. पालखेड समुहातील पालखेड या मध्यम धरणात २६, करंजवण ४१, वाघाड २२, ओझरखेड ३३, पुणेगाव ८, तिसगाव ११, दारणा २५, भावली २५, मुकणे ३३, वालदेवी ४३, कडवा २६, नांदुरमध्यमेश्वर १०० व भोजापुर १० टक्के जलसाठा आहे. गिरणा खोरे धरण समुहात चणकापुर धरणात ४०, हरणबारी ३९, केळझर १८, नागासाक्या शुन्य, गिरणा ३१, पुनद ७६, माणिकपुंज १४ टक्के जलसाठा आहे. गत वर्षी हा साठा ४९.५९ टक्के होता.

————

जिल्ह्यात आतापर्यंत सात तालुक्यांमधील १८६ गावे आणि ४०९ वाड्या अशा एकूण

५९५ ठिकाणी १९१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सरकारी ११, तर

खासगी १८० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरच्या ४०९ फे ºया मंजूर

असून, ४०३ फेया सुरू आहेत.

————-

तालुकानिहाय टँकर

तालुका गावे वाड्या टँकर

बागलाण २६ ०३ २२

चांदवड २४ ४१ २५

देवळा १६ ३२ २२

मालेगाव २४ ४२ २३

नांदगाव ४७ २२२ ४९

सिन्नर ०५ ५४ १५

येवला ४४ १५ ३५

——————————————————————

एकूण १८६ ४०९ १९१

टीम लय भारी

Recent Posts

पंकजा मुंडेंची लढाई जातीयवादाच्या पेचात

बीडची निवडणुक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर कमी आणि जातियतेला धरून अधिक अशीच आता होताना दिसतेय. आरक्षण…

15 mins ago

४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा

उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde)…

16 mins ago

नाशिक इंदिरानगर येथे वॉशिंग मशिनमध्ये ठेवलेले दागिन्यांची चोरी

इंदिरानगरमध्ये (Indiranagar) चोरट्याने चक्क वॉशिंग मशिनमध्ये (washing machine) लपवून ठेवलेले सुमारे दीड लाखांचे दागिने (Jewellery…

43 mins ago

३० मेपर्यंत खोदलेले रस्ते दुरुस्ती न झाल्यास महापालिका नेमकी कोणावर कारवाई करणार?

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून (MNGL) घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्याच्या प्रकल्पासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले (roads…

1 hour ago

दीड लाखांची लाच घेताना पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात

राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक (State Director of Archaeology) संशयित डॉ. तेजस मदन गर्गे…

1 hour ago

100 कोटींच्या TDR घोटाळा अहवालात दडलय काय? 2 वर्षे उलटूनही गुप्तता कायम

महापालिका हद्दीतील व देवळाली शिवारातील टीडीआर (TDR) घोटाळ्याचा तपास केल्यानंतर महापालिकेने त्याचा गोपनीय अहवाल दोन…

2 hours ago