उत्तर महाराष्ट्र

नाशिक मनपाने राबवली स्वच्छता मोहीम

डॉ अशोक करंजकर आयुक्त तथा प्रशासक यांचे आदेशाने व विजयकुमार मुंढे उपायुक्त गोदावरी संवर्धन,मा डॉ श्री आवेश पलोड संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग, मदन हरीचंद्र विभागीय अधिकारी, संजय दराडे विभागीय स्वच्छता निरीक्षक यांचे उपस्थित घनकचरा व्यवस्थापन विभाग पंचवटी, व संत निरंकारी मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने संत निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त स्वच्छ जल स्वच्छ मन अमृत प्रकल्प अंतर्गत आवो सवारे गोदा किनारे या विषयावर तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत गोदावरी नदी रामकुंड तीर्थ क्षेत्र परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

स्वच्छता मोहिमेदरम्यान होळकर पूल ते टाळकुटेश्र्वर दरम्यान पाण्यातील व नदी पात्राचा परिसर स्वच्छ करून २ टन ६८० किलो पाणवेली निर्माल्य,कपडे व तत्सम कचरा निरंकारी मिशनच्या सेवकांच्या व वॉटरर्ग्रेस प्रॉडक्ट्स यांच्या कर्मचारी यांचे मदतीने उचलून घंटागाडी द्वारे पाथर्डि येथे खातप्रकल्प येथे संकलित करण्यात आला आहे.

सदर स्वच्छता मोहिमेत
स्वच्छ जल,स्वच्छ मन या उपक्रमा द्वारे संत निरंकारी मिशन तर्फे सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने ८०० निरंकारी भक्त व वॉटरग्रेसचे ४५ स्वच्छता कर्मचारी सेवेसाठी सभभागी झाले होते.
या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शन नाशिक झोनचे गुलाब पंजवानी सेक्टर संयोजक नाशिक, बाळासाहेब अहिरे,मुख्य पंचवटी ब्रांच,जयकुमार घोडके, वासुदेव भोईर, राकेश भामरे, राजन आमले,अश्विनी पगारे,तसेच सामाजिक कार्यकर्ता चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता निरिक्षक उदय वसावे, राकेश साबळे,मुकादम निलेश गवळी,अनिल नेटावटे,किशोर साळवे वाटरग्रेस प्रॉडक्ट्स चे विलास नाईकवाडे, कृष्णा शिंदे आदींनी मोहीम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago